उस्मानाबाद : गरजू कुटुंबांना मदत देताना नवरदेव राहूल गवळी.  
मराठवाडा

लग्नात बचत झालेल्या पैशातून बांधकाम मजुरांना मदतीचा हात

सयाजी शेळके

उस्मानाबाद : लग्नात बचत झालेल्या पैशातून ११० बांधकाम मजुरांना अन्नधान्याचे किट वाटप करत लग्नसोहळा पार पडला. शहरातील गवळी कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोरोनाच्या संकटाने समाजात रूढ असलेल्या अनेक प्रथा आणि परंपरा यांना फाटा देण्यास प्रवृत्त केले आहे. लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा मोठ्या थाटामाटात आणि झगमगाटात व्हावा अशी अनेक वधू-वराची अपेक्षा असते. मात्र कोरोनाच्या संकटाने यामध्ये चांगलाच बदल झाला आहे. शहरातील गवळी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम व्यवसायात काम करतात. त्याच कुटुंबातील राहुल या युवकाचा विवाह रविवारी (ता. २६) अगदी साध्या पद्धतीने पार पडला. यामध्ये कुठलाही डामडौल नव्हता.

मंगल कार्यालय, जेवणाचा खर्च यातून मोठ्या प्रमाणात बचत झाली. या बचत झालेल्या पैशातून अन्नधान्याचे कीट बनवण्यात आले. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. हे किट शहरात काम करणाऱ्या गरजू बांधकाम मजुरांना वाटप करण्यात आले. सोशल डिस्टनसिंग पाळत एकशे दहा कुटुंबीयांच्या अन्नधान्याचे किट घरपोच दिले.

गवळी कुटुंबाने आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. शिवाय या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. रूढी आणि परंपरामध्ये अडकून न राहता अगदी साध्या पद्धतीने विवाह करून गरीब आणि गरजूंना धन्याचे किट वाटप करून गवळी कुटुंबाने दानशूर्पणाचे दर्शन घडविले आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशातील उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. मात्र दुसरीकडे समाजात रूढ असलेल्या अनेक प्रथा आणि परंपरा बदलण्यास मनुष्याला प्रवृत्त केले आहे. ही एक जमेची बाजू म्हणावी लागणार आहे. लग्नकार्यातील विविध परंपराला फाटा देऊन असे सामाजिक उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा सामान्य वर्गातून व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT