Osmanabad Husband commits suicide due to wife love affair sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे पतीची आत्महत्या

उस्मानाबादच्या कोंड येथील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

कसबे तडवळे : पत्नीच्या प्रेम प्रकरणाला कंटाळून पतीने कोंड येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. परिचारिका असलेली पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा वर्षापासून कार्यरत असलेली परिचारिका, तिचा पती सतीश कवरसिंह तिवारी (रा.कोंड) यांना मुलगा, मुलगी आहे. गेल्या तीन वर्षापासून चारित्र्याच्या संशयावरून सतीश व पत्नी यांच्यात वाद सुरू झाला होता. ३१ मे २०२२ ला रात्री साडेआठच्या सुमारास घरी पत्नी व तिचा प्रियकर असल्याचे सतीशला दिसले. याबाबत जाब विचारला असता दोघांनी सतीशला बेदम मारहाण केली होती.

यासंदर्भात सतीशने ढोकी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. सतीशने वेळोवेळी पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ती ऐकत नसल्याने त्रासाला कंटाळून त्याने आपल्या कोंड या गावात जाऊन शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीशची पत्नी व तिचा प्रियकर यांच्यात अनैतिक संबंध होते, अशा आशयाची तक्रार सतीश तिवारीचा भाऊ उमेश कवरसिंग तिवारी याने ढोकी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३०६ व ३४ प्रमाणे पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नातेवाइकांचा रोष, पत्नी ताब्यात

याबाबत माहिती मिळताच सतीश तिवारीचे नातेवाईक, ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. ढोकी पोलिसांनी तत्काळ दोघांवर गुन्हा दाखल करून पत्नीला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT