umarga strike news 
मराठवाडा

#BharatBandh: जीएसटी करप्रणाली कायद्याच्या जाचक अटींच्या विरोधात शहरात कडकडीत बंद

अविनाश काळे

उमरगा(उस्मानाबाद): #BharatBandh: जीएसटी करप्रणाली कायद्याच्या जाचक अटींच्या विरोधात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) पुकारलेल्या एक दिवसीय देशव्यापी बंदला उमरगा शहर व ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान उमरगा शहरातील सर्व बाजारपेठेतील दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते.

उमरगा व्यापारी महासंघाने याबाबत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जीएसटी कायद्याची (वस्तू व सेवा कर) व्यापाऱ्यांना होणारी अडचण, तसेच जीएसटी कायद्यात ९२७ वेळा बदल करण्यात आले आहेत.

नवीन कायद्यात व्यापाऱ्यांना कर सल्लागार व सी.ए. यांना अटक करण्याचे प्रावधान ठेवले आहे, या व अन्य अनेक अटी नवीन कायद्यामध्ये जाचक ठरणाऱ्या आहेत, त्याला विरोध करण्यासाठी कॉनफिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये देशातील नऊ कोटी व्यापारी व साडेतीन कोटी व्यावसयिक सहभागी झालेली आहे. यात उमरगा व्यापारी महासंघ सहभागी झालेला आहे.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, कार्याध्यक्ष नितीन होळे, सचिव शिवप्रसाद लड्डा, संतराम मूरजानी, महेश आळंगे, रणजीत कटके आदी व्यापारी उपस्थित होते. दरम्यान शहरातील शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठ, सराफ लाईन, पतंगे रोड, इंदिरा चौक, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्यनगर आदी भागातील सर्व व्यापार बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT