marriage 
मराठवाडा

विघ्न काही दूर हाेईना; शुभमंगल सावधान...! मंगलाष्टका कानावर पडण्यास हाेणार उशिर

सकाळवृत्तसेवा

भूम (उस्मानाबाद): कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. आता केवळ ५० जणांच्याच उपस्थितीत लग्न समारंभ उरकून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे याहीवर्षी मंगल कार्यालयाचे मालक, बॅण्ड पथक, मंडप डेकोरेशन यासह इतर व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे.

लग्नसराईत मोठी उलाढाल होत असल्याने व्यावसायिकांसाठी हा सुवर्ण काळ असतो. त्यामुळे लग्नसराईवर व्यावसायिकांचा आशा असतात. पण, यंदाही त्यातून काहीही हाती लागण्याची शक्यता दिसत नाही. एका विवाह समारंभामुळे अनेकांना रोजगार मिळतो.

मंगल कार्यालय, मंडप, सजावटकार, बॅण्ड, डीजे, घोडेवाले, किराणा, कापड, सोनेचांदीचे दुकानदार, फूल विक्रते, गुरुजी, केटर्स, वाहनचालक-मालक, भेटवस्तू विक्रते, छायाचित्रकार, फर्निचर विक्रते, टेलरिंग, ब्युटीशीयन यांच्यासारखे कित्येक व्यवसाय लग्नसराईवर चालतात. पण, कोरोनामुळे गतवर्षी या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. यंदाही तीच परिस्थिती आहे. 

अनेकांनी घेतली कर्जे-
अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय थाटलेला आहेत. पण, वर्षभरापासून कोरोनामुळे उलाढाल ठप्प आहे. त्यामुळे आता कर्जाचे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देऊन कर्जाचे हप्ते थेट माफ करावे, अशी मागणीही होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT