Osmanabad News 
मराठवाडा

चार महिन्यांपासून हमाल वेतनाविना,शासकीय गोदामात कामबंद आंदोलन

नीलकंठ कांबळे

लोहारा : जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमाल-कामगारांना चार महिन्यांपासून कामाचा मोबदला दिला गेला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वरिष्ठ पातळीवर अनेकवेळा पाठपुरावा करूनही वेतन दिले जात नसल्याने हमाल कामगारांनी आठ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम धान्य वितरणावर पडला असून, एप्रिलचे धान्य रेशन दुकानदारांना पोचवायचे कसा? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.


शासनाकडून आलेले धान्याची साठवणूक करून संबंधित रेशन दुकानदाराला पोचविण्यासाठी जिल्ह्यात १६ शासकीय धान्य गोदाम कार्यान्वित केली आहेत. यात १९० हमाल कामगार आहेत. शासनाकडून आलेले धान्य उतरवून घेणे, त्याचा वजनकाटा करून संबंधित रेशन दुकानदारांच्या वाहनात भरून देण्याचे काम हमाल कामगारांकडून करून घेतले जाते. त्यामुळे शासनाच्या धान्य वितरणप्रणालीत हमाल कामगार हा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, याकडेच दुर्लक्ष केले जात आहे.


शासकीय धान्य गोदामात हमालीचे कंत्राट खासगी गुत्तेदारांना देण्यात आले आहे. हमाल मापाडी महामंडळाकडून नेमून दिलेल्या हमाल कामगारांना कामावर ठेवले गेले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १३ शासकीय धान्य गोदामातील हमालीचे कंत्राट एका गुत्तेदाराला तर उर्वरित तीन गोदामाचे कंत्राट अन्य एका गुत्तेदाराला देण्यात आले आहे. यांच्याकडून हमाल कामगारांना दरमहा पगार दिला जातो. यातील तीन शासकीय गोदामातील हमाल कामगारांना त्यांचा पगार दिला गेला आहे. परंतु, लोहाऱ्यासह १३ शासकीय धान्य गोदामातील सुमारे १६० हमाल कामगारांना मागील चार महिन्यांपासून त्यांच्या कामाचा मोबदला दिला गेला नाही.


दरम्यान, हमाली मिळावी, यासाठी कामगारांनी महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडळामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर नोव्हेंबर महिन्याची हमाली देण्यात आली. परंतु डिसेंबरपासून मार्च अखेरपर्यंत म्हणजे चार महिन्यांची हमाली अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग झाला नसल्याने हमाल कामगारांनी एक फेब्रुवारी कामबंद आंदोलन केले. यावर जिल्हा पुरवठा विभागाने लवकरच हमाली देण्यासाठी पाठपुरावा करून तत्काळ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. परंतु, अद्याप हमाली देण्यात आली नाही.

कंत्राटदाराची संपली मुदत
शासकीय धान्य गोदामातील कंत्राटदाराची मुदत संपली आहे. पुरवठा विभागाने मात्र संबंधित कंत्राटदाराला २१ जानेवारीपासून मुदत वाढ दिली आहे. परंतु. हमाल कामगारांची पाच महिन्यांपासून रखडलेली हमाली माथाडी कामगार मंडळाकडे जमा कण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने मागील आठ दिवसांपासून हमाल कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT