Mahavitaran News 
मराठवाडा

महावितरणची वीज तोडणी मुक्या जनावरांच्या जीवावर, शेतकरीही अडचणीत  

सयाजी शेळके

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जिल्ह्यात वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद मुक्या प्राण्यांवर उमटत आहे. वितरण  रोहित्रावरील वीजपुरवठा खंडीत केला जात असून त्यामुळे मुकी जनावरांची तहान भागवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीकडून किमान एक तासभर वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.  जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या वीजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा  खंडीत करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असल्याने कंपनीचे कर्मचारी थेट वीजजोडणी तोडत आहेत. याचा परिणाम शेतीच्या पिकावर होत आहे. दरम्यान पिकांना एखादा दिवस पाणी मिळाले नाही तरी फारसा फरक पडत नाही. पिके वाळून आर्थिक नुकसान होते. 

मात्र हल्ली बहुतांश शेतकऱ्यांकडे किमान एक ते दोन जित्राब (जनावरे) आहेत. यामध्ये दुधाळ जनावरांचा समावेश आहे. अशा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यातील अनेक जनावरे दुभती तर आहेतच, पण काही जनावरे गाभण असतात. अशा जनावरांना वेळेवर पाणी मिळणे आवश्यक असते. मात्र सध्या वीज कंपनीकडून वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने अनेक मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत. त्यामुळे अशा जनावरांसाठी कंपनीने किमान एक तास वीज द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

संवाद साधून वीज तोडा
यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांना शेती उत्पन्नातून चार पैसे आले आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे. त्यांना वीजबील भरण्यासाठी प्रवृत्त करणे. असे प्रकार व्हायला पाहिजेत. थेट वीजपुरवठा खंडीत करण्याच्या ऐवजी अनेक शेकतरी बिल भरण्यास तयार असतात. मात्र कंपनीच्या अशा भूमिकेमुळे ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यात उन्हाचा  कडाका वाढल्याने जनावरांच्या घशाला कोरड पडत आहे. माणुसकीच्या नात्याने किमान एक तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गाभण जनावरांना वेळेत पाणी द्याव लागतं. तुम्ही गावाची वीज तोडीत असताल तर जनावरं कशी जगत्याल. का तुम्ही जनावरं मारायच लायसन काढलय का? अस करू नका, किमान एक तास तरी पाण्याची लाईट सोडा.

- नामदेव कोरे, शेतकरी.

 

कडक उन्हाळा सुरू झालाय. आता काही भिजन नाही. पण, जनावरांच काय करायच. पिक असत तरी वाळल असत. पण, जनावरं मारायची का? मुक्या जनावरांचा काय दोष हाय. जे शेतकरी वीजबील भरणा करीत नाहीत. त्यांच कनेक्शन खुशाल तोडावं. पण, सरसकट डीपी बंद करू नयेत. अन्यथा किसान सभेच्यावतीने जिल्ह्यात मोठं आंदोलन उभ करावं लागल.

- तानाजी वाघमारे, जिल्हाध्यक्ष, किसानसभा, उस्मानाबाद

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT