auction in police station 
मराठवाडा

बेंबळी पोलिसांनी परस्पर केला ५० जप्त वाहनांचा लिलाव; लिलाव रद्द करण्याची नागरिकांची मागणी

शितलकुमार शिंदे

बेंबळी (उस्मानाबाद): येथील पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या तब्बल पन्नास पेक्षा अधिक वाहनांचा बुधवारी (ता. ३१) सकाळी अचानक लिलाव करण्यात आला. मात्र या लिलावाचे प्रगटन प्रादेशिक वर्तमानपत्रात किंवा सार्वजनिक ठिकाणी न केल्याने या लिलावात सहभागी होण्यापासून बरेच लोक वंचित राहिले आहेत. पोलिसांनीच अशाप्रकारे लिलाव घेणाऱ्यास सोईस्कर नियमांचा वापर केल्याने हा लिलाव रद्द करावा अशी मागणी लोकांनी केली आहे.

बेंबळी (ता. उस्मानाबाद) पोलीस ठाण्याच्या हद्दीत पन्नासपेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. मागील काही वर्षात जप्त करण्यात आलेल्या जवळपास पन्नास दुचाकी, ट्रॅक्टर आणि चारचाकी कार या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचा जाहीर लिलाव होणार हे दोन आठवड्यापूर्वी निश्चित झाले होते.

मात्र किती तारखेला होणार हे जाहीर केले नव्हते. सध्या लहानसहान गोष्टींना सोशल मीडियाचा वापर होतो, गावात दवंडी दिली जाते, चावडीवर किंवा गावातील ग्रामपंचायत आदी सार्वजनिक ठिकाणी जाहीर प्रगटन केले जाते. यामुळे या लिलाव प्रक्रियेत जास्तीतजास्त लोकांना भाग घेता आला असता. त्यामुळे शासनाचा महसूलही वाढला असता. मात्र कांही मर्जीतील  विशिष्ट लोकांना बोलावून लिलाव जाहीर नव्हे तर खाजगी केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

पोलीस अधीक्षक यांचे म्हणणे - या बाबत पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांना संपर्क करून झालेला प्रकार सांगितला असता, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात आपण बोलतो असे सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक यांचे म्हणणे - अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनाही याबाबत विचारणा केली असता, आपण आक्षेप नोंदवा ही प्रक्रिया पुन्हाही करता येईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा घाट, आदित्य ठाकरेंचा आरोप

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT