lohara 
मराठवाडा

शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांवर उपासमारीची वेळ, पाच महिन्यांपासून पगार नाही

नीळकंठ कांबळे

लोहारा (जि. उस्मानाबाद): कोरोना संसर्गामुळे मोलमजुरी करणारे आर्थिक अडचणीत आले असताना लोहारा शहरासह जिल्ह्यातील १३ शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांना मागील पाच महिन्यापासून त्यांच्या पगार दिला गेला नाही. त्यामुळे हमाल कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. वरिष्ठ पातळीवर अनेकवेळा पाठपुरावा करूनही हमाली दिली जात नसल्याने हमाल कामगारांनी आठ दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम धान्य वितरणावर पडला असून एप्रिल महिन्याचे धान्य रेशन दुकानदारांना पोचवायचे कसा? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

शासनाकडून आलेले धान्याची साठवणूक करून संबंधित रेशन दुकानदाराला पोचविण्यासाठी जिल्ह्यात १६ शासकीय धान्य गोदाम कार्यान्वित केली आहेत. यात १६० पेक्षा अधिक हमाल कामगार आहेत. शासनाकडून आलेले धान्य उतरवून घेणे, त्याचा वजनकाटा करून संबंधित रेशन दुकानदाराच्या वाहानात भरून देण्याचे काम हमाल कामगारांकडून करून घेतले जाते. त्यामुळे शासनाच्या धान्य वितरणप्रणातील हमाल कामगार हा महत्वाचा दुवा आहे. मात्र याकडेच दुर्लक्ष केले जात आहे.

शासकीय धान्य गोदामात हमालीचे कंत्राट खासगी गुत्तेदारांना देण्यात आले आहे. महमाल मापाडी महामंडळाकडून नेमूण दिलेल्या हमाल कामगारांना कामावर ठेवले गेले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १३ शासकीय धान्य गोदामातील हमालीचे कंत्राट एका गुत्तेदारला तर उर्वरीत तीन गोदामाचे कंत्राट अन्य एका गुत्तेदारला देण्यात आले आहे. हमाल कामगारांना दरमहा पगार दिला जातो. यातील तीन शासकीय गोदामातील हमाल कामगारांना त्यांचा पगार दिला गेला आहे. परंतू लोहारासह १३ शासकीय धान्य गोदामातील सुमारे १६० हमाल कामगारांना मागील चार महिन्यापासून त्यांच्या कामाचा मोबदला दिला गेला नाही.

दरम्यान, हमाली मिळावी, यासाठी कामगारांनी महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडाळामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर नोव्हेंबर महिन्याची हमाली देण्यात आली. परंतु डिसेंबरपासू मार्च अखेरपर्यंत म्हणजे चार महिन्याची हमाली अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग झाला नसल्याने हमाल कामगारांनी एक फेब्रुवारी कामबंद आंदोलन केले. यावर जिल्हा पुरवठा विभागाने लवकरच हमाली देण्यासाठी पाठपुरावाकरून तत्काळ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप हमाली देण्यात आली नाही.

शासकीय धान्य गोदामातील कंत्राटदाराची मदत संपली आहे. पुरवठा विभागाने मात्र संबंधित कंत्राटदाराला २१ जानेवारीपासून मुदत वाढ दिली आहे. परंतु हमाल कामगारांची पाच महिन्यापासून रखडलेली हमाली माथाडी कामगार मंडळाकडे जमा कण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने मागील आठ दिवसापासून हमाल कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शासकीय धान्य वितरण सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे एप्रील महिन्याचे धान्य वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन झाले आहे. त्याचा परिणाम मोलमजुरी करणाऱ्यांवर पडत आहे. सामान्यांची परिस्थिती गंभीर बनत चालली असताना त्यातच शासकीय धान्य गोदामात काम करणाऱ्या हमाल कामगारांची पाच महिन्यापासूनची हमाली मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १६० हमाल कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. रोजगाराचा दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्याने हमाल कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT