भूम : आठवडे बाजार बंद असल्याचे जाहीर करूनही भाजीविक्रीसाठी ठाण मांडलेल्या विक्रेत्यांना हुसकावून लावताना पोलिस व पालिकेचे कर्मचारी.  
मराठवाडा

गर्दी झाल्याने पोलिसांवर आली हुसकावण्याची वेळ

अब्बास सय्यद

भूम (जि. उस्मानाबाद) : शहरातील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर करूनही भाजी विक्रेत्यांनी पंचायत समिती परिसरातील आलमप्रभू मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीविक्रीसाठी ठाण मांडले होते. या ठिकाणी भाजी खरेदीसाठी ग्राहकांचीही गर्दी होण्यास सुरवात झाली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतरही काही विक्रेत्यांनी पुन्हा ठाण मांडल्याने अखेर त्यांना हुसकावून लावण्याची वेळ पोलिसांवर आली. 

दर गुरुवारी शहरातील आठवडे बाजार असतो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार भरणार नसल्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे. बाजार बंद असल्यामुळे गुरुवारी (ता. १९) भाजी विक्रेत्यांनी आलमप्रभू मंदिराकडे जाणाऱ्या फुटपाथवर भाजीविक्रीसाठी ठाण मांडले. गर्दी होताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांना उठवण्यासाठी हालचाली केल्या. आमचा माल कोठे विकायचा, असा प्रश्न भाजी विक्रेत्यांनी केला.

भाजी विक्रेत्यांनी सहकार्य न केल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क केला. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सर्व भाजी विक्रेते व ग्राहकांना कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याचे पटवून देत विनंती करून तेथून परत पाठवले. परंतु पोलिस अधिकारी परतल्यानंतर काही विक्रेत्यांनी पुन्हा ठाण मांडले. त्यानंतर मात्र पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवत सर्वच भाजी विक्रेत्यांना, खरेदीदारांना हुसकावून लावले. पुन्हा या ठिकाणी विक्रीसाठी बसलात तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर परिसरातील गर्दी कमी झाली. 

आठ पानटपरीचालकांवर गुन्हे दाखल 
उस्मानाबाद : पानटपरी बंद ठेवण्याचे आदेश न पाळल्याने जिल्ह्यातील आठजणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १७) दिले होते. तरीही जिल्ह्यात काही ठिकाणी पानटपऱ्या सुरू होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील आठ पानटपरी चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अंकुश राम सितापे, गणेश किसन बसवेकर, आयुब इमाम शेख, प्रमोद शिवाजी टकले (सर्व रा. भूम) यांनी येथील चार वेगवेगळ्या ठिकाणी, तर गुणाजी रतन तेलंग (तांदुळवाडी, ता. कळंब), सागर धर्मराज कचरे (रा. येडशी, ता. उस्मानाबाद) यांनीही पानटपरी सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावल्याचे लक्षात आले. तसेच शारेख शमशाद काझी, अरफात अहमद शेख (दोघे रा. उस्मानाबाद) या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ताब्यात असलेल्या पानटपऱ्या चालू ठेवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली.  पानटपरीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार वाढतात. यातून रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यासाठी पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश देऊनही काही जणांनी आदेश न पाळल्याने त्या आठही जणांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT