file photo 
मराठवाडा

फिरणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर

नेताजी नलवडे

वाशी (जि. उस्मानाबाद) : जमावबंदी आदेशाचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. यापुढे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून सापडलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन, प्रशासन विविध उपाययोजना करीत असून, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देऊन १४४ कलम लागू केले आहे. मात्र अजूनही शहरातील काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी विविध रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळत आहेत.

यासाठी प्रशासनाकडून यापुढे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्यात सापडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजपुरे यांनी दिली. 

तालुक्यात सुदैवाने एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. मात्र जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यांत तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे. मात्र अजूनही काही नागरिक भाजीपाला किंवा किराणा खरेदीच्या कारणाने घराबाहेर पडत असल्याचे दिसते. किमान आठ दिवस पुरेल एवढा किराणा व भाजीपाला एकाचवेळी खरेदी करावा, त्यावेळीही गर्दी करू नये, समाजिक अंतर राखावे, घरातच थांबण्यावर भर द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT