Lumpy Virus News esakal
मराठवाडा

Lumpy Skin Disease : लम्पीमुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर

जळकोट तालुक्यात आतापर्यंत तीन जनावारांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळकोट : तालुक्यात संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तालुक्यात आतापर्यंत तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव होऊन नये यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे.

तालुक्यात एकूण २६ हजार जनावरे असून, तालुका डोगराळ भाग असल्यामुळे म्हैस, गाय, बैल, शेळ्या मेंढ्याचे प्रमाण अधिक आहे. लम्पीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांवर नविन संकट ओडले आहे. आधी सतच्या पावसाने खरीप पिके गेली तर आता शेतकऱ्यांवर लम्पी आजाराचे संकट आले आहे. यामुळे शेतकरी संकटात आहे. तालुक्यात काही गावात लम्पी आजाराचे जनावरे आढळून आले असून पशुवैद्यकीय पथकाकडून त्यांच्या उपचार करण्याचे काम सुरू आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे लम्पी आजाराचे प्रमाण कमी आहे. जनावरांना लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुपालकाने तात्काळ पशुवैद्ययकीय अधिकारी किंवा दवाखान्यास संपर्क साधण्याचे आवाहन पशुवैद्ययकीय अधिकारी सुरेखा नामवाड यांनी केले आहे.

दरम्यान पशुवैद्यकीय पथकाकडून लम्पी आजार पसरुनये यासाठी जनवरांच्या गोठ्यांची फवारणी तसेच प्रतेक गावात जावून जनवरांना लसीकरण करण्यात येत असले तरी पशुपालकांनी सर्तक राहून जनवरांची काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात लम्पी आजारामुळे आतापर्यंत तीन जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकात भीतीचे वातावरण पसरले आहे. लम्पीची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्याांतून होत आहे.

तालुक्यात एकुण २६ हजार जनावरे असून, यातील दहा हजार जनवरांना लम्पी आजाराचे लसीकरण करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील जनावरांची संख्या घेऊन पूर्ण लसीकरण करण्यात येत आहे. तालुक्यात लम्पी आजारांचा जास्त प्रादुर्भाव नसला तरी पशुपालकांने जनावरांचे लसीकरण करून घेऊन जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. लम्पी आजाराच्या लसी भरपूर असल्यामुळे लसीकरण करून घेण्यास अडचण येणार नाही.

- सुरेखा नामवाड, पशुवैद्यकीय अधिकारी जळकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT