रुई (ता. उस्मानाबाद) : तेरणा नदीच्या पात्राच्या अलीकडे असलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. 
मराठवाडा

Osmanabad Rain : उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस, तेरणा नदीला पूर

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हाभर (Rain In Osmanabad) गुरुवारी (ता.२३) झालेल्या पावसाने दाणादाण उडाली असून अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळंब-ढोकी मार्गावर (भाटशिपुरा) येथील नदीला पूर आल्याने हा रस्ता वाहुतकीसाठी बंद पडला आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागातही चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडविली आहे. शहरात यंदाच्या हंगामातील (Rain) सर्वाधिक म्हणजे ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे तीन तास जोरदार पाऊस होता. त्यानंतरही पहाटे एक वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी होते. संजीवनी हॉस्पिटल, ख्वाजानगर, मिलीकॉलनी येथील अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यात वीजपुरवठा गुल झाल्याने नागरिकांची झोप उडाली. काही ठिकाणी घरामध्ये पाणी येत असल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. तर अनेक इमारतीच्या तळमजल्यावर पाण्याचे डोह साचले होते. त्यामुळे सकाळपासूनच पाणी काढण्याचे काम सुरू झाले होते.

कळंब-ढोकी रस्ता बंद

कळंब (Kalamb) तालुक्यातील भाटशिरपुरा येथे पुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. मात्र रात्री झालेल्या पावसाने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रात्री उशीराने घराकडे निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

तेरणेला पूर

रात्री झालेल्या पावसाने अनेक वर्षानंतर येथील नद्यांना पूर आला आहे. तेरणा नदीही दुथडी भरून वाहत आहे. यंदाच्या हंगामात नदीला पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. रुईच्या पुलाला पाणी लागत असून वाहनधारकांनी सावकास जाण्याचे आवाहन प्रशानाने केले आहे. शिवाय तेरणा धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.

शिवारात पाणीच पाणी

सध्या सोयाबीनचे पिक काढणीच्या अवस्थेत आहे. अशाच वेळी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या अनेक शेतात पाणी दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असून मोठा पाऊस होत असल्याने सोयाबीनची नासाडी होण्याचा धोका वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT