Osmanabad News
Osmanabad News 
मराठवाडा

उस्मानाबाद : ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा होणार कायापालट 

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा येत्या काळात कायापालट होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या या स्थळाची डागडुजी तसेच अपूर्ण कामे करण्यात येत आहेत. 

पुरातत्त्व खात्याने जिल्ह्यातील परंडा, नळदुर्ग तसेच लातूर जिल्ह्यातील औसा येथील किल्ला तसेच धारूर, नांदेड येथील किल्ला येथे मोठ्या प्रमाणावर संवर्धनाचे काम केल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात उस्मानाबादजवळील धाराशिव लेणीचे काम सुरू केले आहे. 

धाराशिव लेणींचे संवर्धन व्हावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून येथील इतिहासप्रेमी तसेच पर्यटन समितीकडून होत होती. पुरातत्त्व विभागाच्या प्रक्रियेनंतर आता या कामाची सुरवात झाली असून लेणीच्या कामासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून येथे होणाऱ्या दगडी कामाला सुंदरता येण्यासाठी दक्षिण भारतातून कुशल कारागीर बोलावले आहेत.

मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा व वेरूळ येथील लेणीकडे पर्यटकांचा ओढा दिसून येतो, त्या तुलनेत उस्मानाबाद काहीसे दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. नळदुर्ग किल्ल्याला आता मध्यंतरी केलेल्या कामामुळे पर्यटकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. पुरातत्त्व खात्याच्या वतीने आता लेणीकडेही लक्ष वेधले असून या नवीन कामामुळे लेणीचे संवर्धन चांगल्या प्रकारे होऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनेही फायदा होईल, असे इतिहासप्रेमी सांगत आहेत.

पर्यटनवाढीला चालना मिळणार

अनेक वर्षांपासून सातत्याने या वारसा स्थळाला चांगले स्वरूप मिळण्यासाठी उस्मानाबादकरांकडून प्रयत्न केले होते. काही वर्षांपूर्वी येथे शहरातील जागरूक नागरिकांनी स्वच्छता करून एक संदेश दिला होता. जिल्ह्यातील या अद्वितीय व प्राचीन वारसास्थळाला या नवीन कामामुळे जीवदान मिळणार असून या भागातील पर्यटनवाढीला यामुळे काही प्रमाणात चालना मिळणार आहे. या लेणीत पार्श्‍वनाथांची सुंदर मूर्ती असून पावसाच्या पाणी या लेणीमध्ये झिरपत आहे. साहजिकच त्यामुळे त्याची मजबुती कमी झाल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यतः स्तंभाचे काम करण्यात येत आहे. त्याला मजबुती प्राप्त व्हावी यासाठी दगडाचे बांधकाम होत आहे. या कामामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या पर्यटनस्थळाला जीवदान मिळणार आहे. 
- जयराज खोचरे, पुरातत्त्व अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT