kharif sowing pending lack of rainfall sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

पेरणी झालेले शेतकरी चिंतेत : तुळजापुरात मृग कोरडाच

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : तालुक्यात खरीप पेरणी केलेले शेतकरी पेरणी झाल्याने चिंतेत आहेत तर पावसाचे आगमन कधी होईल या आशेवर ९० टक्के शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी पेरणी होईल या आशेने शेतकरी वर्ग तयारीला लागला होता. काही शेतकऱ्यांनी बी-बियाणांची तयारी केली. तथापि खरिपाची पेरणी एखादा दमदार पाऊस झाल्यानंतर करू या आशेवर शेतकरी थांबलेला आहे. तालुक्यात १ लाख १० हजार हेक्टरपैकी सुमारे ८० हजार हेक्टर सोयाबीनची पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

मृग नक्षत्रात आघाडीची पेरणी झाल्यास उत्पन्नाचा चांगला स्त्रोत येतो अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. तथापि पाऊसच दमदारपणे नाही. त्याचा फटका खरीप पेरणीला झालेला आहे. कृषी कार्यालयाकडून साधारणपणे साडे सात हजार ते दहा हजार हेक्टरपर्यंत पेरणी झाल्याचा अहवाल गेलेला आहे. शेतकरी वर्ग पेरणी झालेले क्षेत्र चांगले उगवण झाल्यास त्याला दमदार पावसाची आवश्‍यकता आहे असे सांगत आहेत. तथापि केवळ वारा सध्या आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात एक एकरी साधारण साडे आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये पेरणी पूर्वीची रोटावेटरची मशागत तसेच ट्रॅक्टरने पेरणी आणि खताचा एकरी पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च आहे.

सर्व काही ठप्प

पाऊस नसल्याने ट्रॅक्टरवर पेरणी करणारे ट्रॅक्टर व्यावसायिक सध्या पेरणी बंद असल्याने व्यवसायाविना आहेत. तसेच खते आणि बियाणांचे दुकानदार शेतकरी बियाणे आणि खते खरेदीसाठी पाऊस नसल्याने येत नाहीत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे पेरणी करण्याचे क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यांना अंतर्गत मशागत करण्याची वेळ आली आहे.

खर्च वाया जाणार

ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केलेली आहे ते पाऊस केव्हा पडेल याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच पाऊस न पडल्यास त्यांचा पेरणीचा खर्चही वाया जाणार आहे. आमच्या भागात सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या केलेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया काटी येथील शेतकरी निलय्या सोनवणे यांनी दिली.

तालुक्यात साधारणपणे दहा टक्के पेरणी झालेली आहे. पाऊस नसल्याने सध्या पेरणी थांबलेली आहे. आठ ते दहा टक्के पेरणी तालुक्यात झालेली आहे. साधारणपणे आठ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

- संजय जाधव, तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT