File photo 
मराठवाडा

बोचऱ्या थंडीने उस्मानाबादकर गारठले

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात नीचांकी 10.9 अंश सेल्सिअस तापमान रविवारी (ता. 29) नोंदले गेले. सकाळी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीत आणखीनच भर पडली. बोचऱ्या थंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

थंडीचा कडाका वाढला 
जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यातही डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याची स्थिती होती. या वातावरणाचा फटका हरभरा आणि ज्वारी पिकांना बसत आहे. या पिकांवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सध्याही अशीच स्थिती असली तरी दोन दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी (ता. 28) रात्रीपासून बोचऱ्या थंडीला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रविवारी पहाटेपासून थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारे सुरू असल्याने थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रविवारी दिवसभर अशीच परिस्थिती होती. 

थंडीपासून बचावासाठी अनेकजण सकाळी उन्हाची ऊब घेतानाचे चित्र दिसून आले. मात्र काहीवेळ ढगाळ वातावरण आणि काहीवेळ ऊन अशी परिस्थिती अनुभवावी लागत आहे. त्यातच वाऱ्यामुळे थंडीमध्ये आणखी भर पडत असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक घराबाहेर न पडणेच पसंत करीत आहेत. रविवारी सुटी असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी सातनंतर शहरातील अनेक रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याची परिस्थिती होती. पहाटेपासूनच हुडहुडी भरणारे वारे असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर अशीच परिस्थिती होती. त्यामुळे सध्या जिल्हा गारठला असल्याचे चित्र आहे. 
यंदा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात दमदार पाऊस झाला. सध्या शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पाणी आहे. त्यातच वारे वाहत असल्यामुळे थंडीमध्ये वाढ होत असल्याचे काही जाणकार सांगत आहेत. रविवारी कमाल 25.1 आणि किमान 10.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यंदाच्या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान आहे. 

गव्हासाठी पोषक वातावरण 
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली आहे. गहू पिकाच्या वाढीसाठी थंडी आवश्‍यक असते. त्यामुळे सध्या निर्माण झालेली थंडी गहू पिकाच्या वाढीसाठी पोषक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT