Krushna Tawale, Yuvak Congress National Spoke Person
Krushna Tawale, Yuvak Congress National Spoke Person  esakal
मराठवाडा

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी उस्मानाबादचे कृष्णा तवले

सयाजी शेळके

उस्मानाबाद : युवक काँग्रेसच्या (Yuvak Congress) राष्ट्रीय प्रवक्तेपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा तवले (Krushna Tawale) यांची निवड झाली आहे. देशभरातून निवडलेल्या ३०० युवकांपैकी कृष्णा यांनी तिसरा क्रमांक मिळविला असून पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्तेपद (Spoke Person Of Yuvak Congress) मिळाले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षाकडून कृष्णा यांचे कौतुक केले जात आहे. युवक हा राजकारणातील दिशादर्शक असतो. तर वक्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी राजकीय क्षेत्रात (Osmanabad) मोठी झेप घेतली आहे. याच हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 'यंग इंडिया के बोल' ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक राज्यातून पाच याप्रमाणे देशभरातून ३०० स्पर्धक निवडण्यात आले होते. दिल्लीमध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचे पंच म्हणून म्हणून माजी केंद्रीयमंत्री अजय माकण, इम्रान प्रतापगडी, दिल्ली महिला प्रदेशाध्यक्ष अल्का लांबा, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress) प्रवक्ते पवन खेरा, राघीनी नायक, जैवीर शेरगील, प्रणव झा यांनी भूमिका बजावली.

देशातील ३०० स्पर्धकांतून तिघांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड केली आहे. यामध्ये दिल्ली येथील अवनी बन्सल यांनी प्रथम, तेलंगणाचे विगेंद्र वर्मा यानी दुसरा क्रमांक मिळाला असून कृष्णा यांनी तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविले आहे. कृष्णा तवले यांचे मूळगाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील शेलगाव (जा) आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आहेत. कृष्णा यांचे सध्या शिक्षण सुरू असून सामान्य कुटुंबातील युवकाने काँग्रेसच्या (युवक) राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविल्याने सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

काँग्रेस पक्षाची राष्ट्रीयस्तरावर मोठी जबाबदारी

राष्ट्रीयस्तरावर काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येणार आहे. या शिवाय आगामी काळात होणाऱ्या निवडणुकाही त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांना संधी दिली जाऊ शकते. कृष्णा यांची निवड उस्मानाबाद जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT