केदारखेडा : ऑगस्ट महिन्याच्या तारखेचे विद्यार्थ्यांना दिलेले धनादेश.  
मराठवाडा

विद्यार्थ्यांच्या हाती आऊटडेटेड चेक 

अरुण ठोंबरे

केदारखेडा -  दुष्काळामुळे वर्ष 2018-19 च्या दहावी, बारावी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्यात आली. शुल्कमाफीपोटी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून चक्‍क ऑगस्ट महिन्याच्या तारखेचे धनादेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत धनादेश वटविण्याची मुदतही निघून गेली. आता या आऊटडेटेड चेकचे करावे काय, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. 

गतवर्षी दुष्काळी स्थितीतही विद्यार्थ्यांनी उधारी, उसनवारी करून दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्काची भरणा केली होती. दुष्काळामुळे शुल्कमाफीबाबत वाढती मागणी होती. त्यामुळे शासनपातळीवर तसा निर्णय झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीपोटीचे धनादेश निर्गमित करण्यात आले; मात्र हे धनादेश विद्यार्थ्यांचा हाती पडेपर्यंत वटविण्याची मुदतही संपून गेली. काही जणांना केवळ मुदतीच्या चार ते पाच दिवसांअगोदर धनादेश मिळाले. परिणामी ते बॅंकेत जमा करण्याबाबतही अनेकांची अडचण झाली. ​

अनेक विद्यार्थ्यांचे नाही खाते 
अनेक विद्यार्थ्यांचे बॅंकेत खाते नाही, त्यांची अडचण झाली आहे, असा प्रकार ठिकठिकाणी घडल्याने या धनादेशाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. 

दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या दुष्काळी परीक्षा शुल्कमाफीच्या धनादेशाचा तपशील शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे धनादेशाची दुरुस्ती; तसेच मुदतवाढ मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 
- दिलीपराव शहागडकर, 
गटशिक्षणाधिकारी, भोकरदन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT