photo 
मराठवाडा

थकबाकीदारांनी घेतला धसका

जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील सतरा गावांत महावितरण कंपनीचे ४० लाख रुपये विद्युत देयके थकबाकी राहिले आहेत. मार्चअखेर वसुलीसाठी सोमवारी (ता. दहा) तीन गावांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच उर्वरित १४ गावांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

तालुक्यात १३३ गावांचा समावेश आहे. सर्व गावांना वीजपुरवठा केल्या जातो. काही गावांतील विद्युत ग्राहकांची वीज देयके थकली आहेत. मात्र, मोजकेच ग्राहक नियमित वीजबिल भरणा करतात. या विभागाकडून थकीत बिले वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यातील कारेगाव, गारखेडा, गोंडाळा, बोडखा, चिंचखेडा, लिंगदरी, लिंबाळा, हुडी, चिखलागर, बेलखेडा, सुंदली मुटकुळे, धानोरा, बोरखेडी, बरडा, वझर खुर्द, बटवाडी या १७ गावांकडे ४० लाख १९ हजार रुपयांची थकबाकी राहिली आहे.

१४ गावेही रडारवर 

वारंवार पाठपुरावा करूनही थकबाकी वसूल झालीच नाही. काही दिवसांपूर्वी सरपंच, पोलिस पाटील व पोलिस प्रशासनाला विद्युत थकबाकीच्या कारणामुळे गावाचा वीजपुरवठा खंडित केल्या जाईल, असे कळविण्यात आले होते. सोमवारी बरडा, बन, वझर खुर्द या तीन गावांचा सायंकाळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उर्वरित १४ गावांचाही लवकरच वीजपुरवठा केला जाणार आहे. 

कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू 

थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने थकबाकीदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. या सोबतच वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांचाही पुरवठा तोडला जात असल्याने वीज ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, यातून सध्या तरी कृपिपंपधारकांना दिलासा मिळाला आहे.  

४० लाखांची थकबाकी

तालुक्‍यातील १७ गावांकडे ४० लाख १९ हजार रुपये विद्युत बिल थकबाकी आहे. वीज देयके वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मार्चअखेर थकबाकी वसुली होणे गरजेचे आहे. त्‍यामुळे तीन गावांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उर्वरित गावांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असून ग्राहकांनी बिल अदा करून सहकार्य करावे.
-एस. बी. वडगावकर, कनिष्ठ अभियंता

बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांनाही फटका

आम्ही नियमित वीजबिल भरणा करतो. मात्र, संपूर्ण गावाच्या थकबाकीपोटी सोमवारी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार घडला आहे. नियमित बिल भरणा करणाऱ्यांची स्थिती गव्हाबरोबर किडे रगडल्यागत झाली आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचेच जोडणी तोडने गरजेचे होते. मात्र असे घडले नाही.
-जनार्दन सानप, ग्रामस्‍थ, बरडा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : आमच्या नोंदी सापडल्या म्हणून आरक्षण मागतोय- मनोज जरांगे

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT