लोहारा (जि.उस्मानाबाद) : मुख्य विद्युत वाहिनी तुटून लागलेल्या आगीत चार एकरवरील ऊसाचा फड जळून खाक झाला. यात सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन बरोबरच ऊस पिकही हातातून गेल्यामुळे तालुक्यातील एकोंडी येथील बसवराज स्वामी या शेतकऱ्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.  Sugar Cane Burned In Lohara Taluka Of Osmanabad
मराठवाडा

लोहाऱ्यात चार एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे आठ लाखांचे नुकसान

नीळकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसाने झाले. त्यातच बुधवारी (ता.सहा) मुख्य विद्युत वाहिनी तुटून लागलेल्या आगीत चार एकरवरील ऊसाचा फड जळून खाक झाला. यात सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन बरोबरच ऊस पिकही हातातून गेल्यामुळे तालुक्यातील (Lohara) एकोंडी येथील बसवराज स्वामी या शेतकऱ्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. माकणी धरणाच्या नदीकाठी असलेल्या सास्तूर, एकोंडी, राजेगाव, रेबेचिंचोली येथील शिवारात धरणाचे पाणी नदीपात्रात (Osmanabad) सोडल्याने पुरात सोयाबीन वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकोंडी येथील शेतकरी बस्वराज स्वामी यांचे सर्व्हे नंबर ३०/१ मध्ये शेती आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रात सोयाबीन तर उर्वरित चार एकर क्षेत्रावर ऊसाचे पीक घेतले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे (Farmer) सोयाबीन हातचे गेल्याने नुकसान झाले. झालेल्या सोयाबीनच्या नुकसानीची कसर किमान ऊसाच्या उत्पन्नातून निघेल अशी अपेक्षा होती.

परंतु अखेर नियतीने स्वामी यांना दगा दिला. ऊसाची लागवड केलेल्या क्षेत्रातूनच एकोंडी ते कवठा दरम्यान मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विद्युत वाहिनी तुटल्याने मोठी आग लागली. हाहा म्हणता आगीने आक्राळरूप धरण करीत चार एकरावरील ऊसाच्या फडाला कवेत घेतले. साखर कारखाना सुरू होताच ऊसाची तोड होणार होती. परंतु तळहातातील फोडाप्रमाणे जपलेला उभा ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे आठ लाखाचे नुकसान झाले. सोयाबीन बरोबरच ऊसाचे नुकसान झाल्याने बसवराज स्वामी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, महसूल विभागाचे तलाठी कोकाटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT