Pachod Crime News Suspicious death of a pregnant woman in Nandar sakal
मराठवाडा

Pachod Crime News : नांदर येथे गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

वीस वर्षीय गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नांदर (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.एक) सायंकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : वीस वर्षीय गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नांदर (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.एक) सायंकाळी घडली.यासंबंधी अधिक माहिती अशी, एकतुनी (ता.पैठण) येथील सानिया शेख (वय २० वर्षे) हीचा विवाह दोन वर्षापूर्वी नांदर (ता.पैठण) येथील शेख साहील याचे सोबत झाला होता.

सदर विवाहिता अडीच महिन्याची गर्भवती असून दुपारी तिने आपले कामकाज आटोपून शेळ्यांना चारावैरण केली व आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेली. तत्पूर्वी तिचे आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

सायंकाळी पाच पाच वाजेच्या सुमारास तिला कुटुंबियांनी आवाज दिला मात्र दरवाजा उघडला नसल्याने व आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा ते पलंगावर मृतावस्थेत आढळून आली.

त्याच्या कुटूंबियानी तिच्या माहेरच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्याचे माहेरचे नातेवाईक व पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सानिया हीस सांयकाळी रुग्णवाहीकेद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकिय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. यावेळी तिच्या नातेवाईकांनी मृत्यूविषयी सासरच्या लोकांविरुद्ध आक्षेप घेतल्याने त्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.

सदर विवाहीतेच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट स्पष्ट झाले नसून उत्तरणीय तपासणीनंतर उपलब्ध अहवाल आल्यावरच या मृत्यूचा उलगडा होऊन पोलिस उचित कार्यवाही करतील असे पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले.

सदर मृत विवाहीचे वडील कोरोना काळात मृत झाले होते. वडिलाच्या निधनानंतर तिची आई मामाकडे फारोळा (ता.पैठण) येथे राहत आहे. वैद्यकिय अहवालानंतरच विवाहीतेच्या मरणाचे कारण स्पष्ट होईल. तुर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT