नितीन गडकरी sakal
मराठवाडा

पैठण-पंढरपूर महामार्गावर दर्जाहीन कामामुळे भेगा; गडकरींकडे तक्रार

पैठण ते पंढरपूर या पालखी राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ७५२) दर्जाहीन कामामुळे आताच भेगा पडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बीड : पैठण ते पंढरपूर या पालखी राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ७५२) दर्जाहीन कामामुळे आताच भेगा पडल्या आहेत. पाटोदा तालुक्यातील पाटोदा शहर तसेच घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पैठण ते पंढरपूर हा पालखी महामार्ग केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आला.

काम दर्जाहीन झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदार, शासकीय अभियंता यांच्यावर कारवाई करून काम करणाऱ्या यंत्रणेला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना मेलद्वारे निवेदन पाठवून करण्यात आली.

सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे म्हणाले. या राष्ट्रीय महामार्गाचे काम २०१७ पासून सुरू आहे. ठेकेदाराकडून अर्धवट काम केले गेले आहे. पाटोदा व शिरूर तालुक्यातून जाणारा ६७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बाह्यवळणाचे कामही अर्धवट असून वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.

पाटोदा तालुक्यातील मौजे घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून त्याठिकाणी रात्री-अपरात्री वाहनांची चाके भेगांमध्ये फसून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. देयक रोखून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT