अदाणींचे ४ उत्तराधिकारी! २ मुलांसह पुतण्यांवर जबाबदारी सोपवण्याचा प्लान; १७ लाख कोटींचे साम्राज्य कोण सांभाळणार?

Gautam Adani’s Succession Plan उद्योगपती गौतम अदाणी यांनी उद्योगसमुहाचे उत्तराधिकारी म्हणून चार जणांची यासाठी निवड केलीय. या चौघांमध्ये त्यांचे दोन सुपूत्र आणि दोन पुतण्यांचा समावेश आहे. त्यासाठी प्लानही तयार केला आहे.
Adani Group chairman
Gautam AdaniSakal
Updated on: 

देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या अदाणी समूहाचा पुढचा उत्तराधिकारी कोण असणार हे ठरलं आहे. उद्योगपती गौतम अदाणी यांनी चार जणांची यासाठी निवड केलीय. या चौघांमध्ये त्यांचे दोन सुपूत्र आणि दोन पुतण्यांचा समावेश आहे. चौघांना उत्तराधिकारी ठरवण्याच्या या प्लानला 'G2 लीडरशिप' असं नाव देण्यात आलं आहे. योग्य वेळी समूहाची जबाबदारी या चौघांकडे सोपवली जाणार आहे. अदाणी समूहाची उलाढाल आणि बाजारातील एकूण मूल्य हे १७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

Loading content, please wait...