file photo 
मराठवाडा

Video : संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गांधी पार्क परिसरातून मंगळवारी (ता.११) सकाळी पालखी काढण्यात आली. यात सोनार समाजातील महिला - पुरुष सहभागी झाले होते. या पालखीचा समारोप नांदखेडा रस्त्यावरील संत नरहरी महाराज यांच्या मंदिराजवळ करण्यात आला.

परभणी शहरातील सोनार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या संत नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता.११) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी पार्क भागातून सकाळी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची पालखी काढण्यात आली. यात सोनार समाजातील बहुतांश महिला व पुरुष सहभागी झाले होते. सवाद्य ही पालखी शहरातील विविध भागातून मिरविण्यात आली. गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, शिवाजी रोड, नानलपेठ, विद्यानगर कॉर्नर, सरस्वती नगर, पारदेश्वर महादेव मंदिर, बेलेश्वर महादेव मंदिर मार्गे ही पालखी नांदखेडा रस्त्यावरील संत नरहरी महाराज यांच्या मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले. महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.


असे आहे संत नरहरी महाराजांचे चरित्र 
विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती, यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.

 पांडुरंग परमात्माच शंकर भगवान 
एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली. पण, ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की, पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. 


पंढरपूर येथे समाधी
यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले, ‘देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।’,
नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार (महामुनी) होते असे असे म्हटले आहे. संत नरहरी सोनार यांचे मुळ आडनावं महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद विश्वब्राम्हण असून त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरा समोर आहे. समाधीची पूजा अर्चना वंशज श्री. महामुनी यांचे तर्फे केली जाते. संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार असे झाले. पंढरपूर येथे त्यांचे वंशज प्रमोद दिगंबरराव महामुनी यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे, नरहरी महाराजांच्या पादुका आणि देव पूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांचे कडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते. वंशज प्रमोद महामुनी हे पौरोहित्य करतात.
(चरित्रसार ः विकिपीडिया)


....
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT