panipat yatra 
मराठवाडा

उदगीरमधुन निघणार मराठा पराक्रमाची पानिपत शौर्ययात्रा

युवराज धोतरे

उदगीर : पानिपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास...हा इतिहास जागृत व्हावा, नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी कोल्हापूरच्या इतिहास प्रेमी युवकांनी पुढाकार घेवुन उदगीर ते पानिपत मराठा पराक्रमाची अनुभूती देणाऱ्या पानिपत शौर्ययात्रेचे 7 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. 


शनिवारी (ता.28) पानिपत शौर्य यात्रेच्या आयोजकानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे अश्विन शिंदे, प्रकाश पाटील, आकाश मोरे, विनायक भोसले यांच्यासह बसवराज पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने, प्रकाश मुळे, मोतीलाल डोईजोडे, डॉ.आर. एन. लखोटिया, दत्ताजी पाटील, विजयकुमार पाटील, डॉ.संजय कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. 

सात जानेवारीला कोल्हापुरहून प्रस्थान

पानिपतच्या लढाईत मराठे ज्या मार्गाने गेले, त्याच मार्गाने ही यात्रा जाणार आहे. सात जानेवारी रोजी कोल्हापूर येथून या यात्रेचे प्रस्थान होणार असून ही यात्रा उदगीर येथुन परतुर, बुरानपुर, देवास, गुणा, कुरुक्षेत्र मार्गे पानिपत येथे पोहोचणार आहे. 

तीन अभिनेत्रींविरोधात बीडमध्ये गुन्हा
उदगीर येथुन सुरुवात झालेली पानिपतची लढाई, मराठे ज्या मार्गाने गेले आणि जेथे-जेथे लढले त्या आठवणी, ते अनुभव नव्या पिढीला माहिती असावेत यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मुंबई, ठाणे, चिपळूण, कराड, सातारा, पुणे, औरंगाबाद, बीड, सांगली, इचलकरंजी येथील असंख्य इतिहास प्रेमी सहभागी होणार असल्याचेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

सात राज्यांना जोडणारी यात्रा
देशातील सात राज्यांना जोडणारी ही यात्रा एका अर्थाने मध्य उत्तर भारताला जोडणारी आगळी वेगळी यात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या, दैदिप्यमान इतिहास व पराक्रमाचा या निमित्ताने मार्गातील प्रत्येक गावात स्वराज्य प्रेम, देशप्रेम जागृत करावे व लोकांना जोडावे यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे, जास्तीत जास्त इतिहासप्रेमी नागरिक युवकांनी या यात्रेत सहभागी व्हावेत असे आवाहन श्री. शिंदे यांनी यावेळी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT