Maharashtra Politics Esakal
मराठवाडा

Maharashtra Politics: गळाभेट घेत थोपटली बहिणीची पाठ; राजकीय वर्तुळात वाद मिटल्याच्या चर्चा, मुंडे भावाबहिणीचा फोटो व्हायरल

बीडमध्ये राज्य सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बीडमध्ये राज्य सरकारने काल शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडेही कार्यक्रमाला उपस्थित होते. या नेत्यांनी परळीत आल्यावर आधी गोपीनाथ गडाला भेट दिली. सर्व नेत्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर दिसून आले. या कार्यक्रमात बोलताना दोघांनी एकमेकांचं कौतुक देखील केलं. यावेळी बोलत असताना दोघे मिळून बीडचा विकास करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. यानंतर राजकीय वर्तुळात मुंडे भावाबहिणीतील वाद मिटला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचबरोबर या कार्यक्रमातील एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

धनंजय मुंडे यांना श्रीफळ देण्यासाठी पंकजा जाताच धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीची गळाभेट घेतली. धनंजय मुंडे बहिणीची पाठ देखील थोपटली. त्यावेळी पंकजा मुंडेही भारावून गेलेल्या दिसल्या. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.

मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह आलेले सर्व नेते स्मृतीस्थळावर आल्याने पंकजा मुंडे यांनी प्रत्येकाचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केल्यानंतर पंकजा या धनंजय मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी पुढे आल्या. धनंजय मुंडे यांना श्रीफळ देण्यासाठी पंकजा मुंडे पुढे आल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीची गळाभेट घेतली आणि पाठ थोपटली. त्यावेळी पंकजा मुंडेही भारावून गेल्या. या निमित्ताने मुंडे भावा-बहिणीमधील दुरावा दूर झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळाच रंगली होती.

पंकजा मुंडे यांनी केलं धनंजय मुंडे यांचं कौतुक

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमावेळी बोलताना एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना एकाच मंचावर आल्याचं सांगत धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, 'या मंचाकडे पाहत होते तेव्हा उकाडा होत होता. डिसेंबरच्या महिन्यात गर्मी का होत आहे, लक्षात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र आले आहेत. त्याहीपेक्षा गर्मीचा पारा अधिक वाढला कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT