मराठवाडा

Beed : फडणवीस-पंकजा मुंडेंचा एकाच चॉपरमधून प्रवास; नाराजी दूर झाली का?

मुंडे आणि फडणवीसांनी एकाच चॉपरमधून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Pankaja Munde News : सत्तांतरानंतर झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्या नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज आष्टी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच चॉपरमधून दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पद नाकारल्याने नाराज पंकजांची नाराजी दूर झाली का? असा प्रश्न यामुळे विचारला जात आहे.

दरम्यान, दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवास करण्याचा योग जुळून आल्याने हे पक्षाच्या दृष्टीने चांगली सुरूवात असल्याचे अनेकांचे मत आहे. पंकजा मुंडे या पुण्यात होत्या, तर फडणवीस नागपूर येथून पुण्यात दाखल झाले. त्यानंतर हे दोन्ही नेते एकाच चॉपरमधून आष्टी येथे दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पद न दिल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली आहे का? असा प्रश्न या एकत्र प्रवासामुळे उपस्थित केला जात आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या नावाची मागणी करणार नाही

दरम्यान, कार्यक्रमात बोलताना या कामाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाले आहे. मात्र, या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT