Pankaja Munde Dasara Melava
Pankaja Munde Dasara Melava Esakal
मराठवाडा

Pankaja Munde Dasara Melava: कार्यकर्त्यांच्या CM म्हणून घोषणा अन् अचानक पंकजा मुंडेंचा माईक बंद झाला..

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बीडमधील सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात जनसमुदायाला संबोधित करत आहेत. जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि 'भगवान बाबा की जय' अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली. उन्हातान्हात सभेला हजर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पंकजा मुंडेंनी आभार मानले.

पंकजा मुंडे बोलत असताना कार्यकर्ते CM, CM म्हणून घोषणा देत होते, त्यावेळी भाषण करत असताना पंकजा मुंडेंच्या माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. माईकची वायर कुठेतरी कट झाली, यानंतर पंकजा मुंडे कुत्सितपणे म्हणाल्या सभेत कुणीतरी फुटलं आहे आणि त्याने वायर कट केली असावी, पण माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

दोन दिवसांत तुम्ही 11 कोटींचा चेक जमा केला - पंकजा मुंडे

माझ्या कारखान्यावर छापे पडले तेव्हा तुम्ही कोट्यवधी जमा केले. दोन दिवसांत तुम्ही 11 कोटींचा चेक जमा केला, असं पंकजा मुंडे जमलेल्या जनसमुदायाला म्हणाल्या आणि जनतेचे आभार मानले.

तर त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, ज्यांना पदं दिलं आहेत, ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील. परंतु माझी जनता माझ्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. निवडणुकीत पडले तरी चालेल, पण कधी तुमच्या नजरेतून पडायला नको, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT