parali
parali parali
मराठवाडा

परळीत जोरदार पाऊस; पूल, सिमेंटच्या नाल्यासह गेला वाहून

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड): शहर व परिसरात बुधवारी दुपारी चार ते पाच दरम्यान पडलेल्या जोरदार पावसामुळे काही काळ परळी - आंबेजोगाई रस्ता बंद करण्यात आला होता. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून तात्पुरता तयार करण्यात आलेला रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने बंद करण्यात आला होता.

शहर व परिसरात गेल्या तीन, चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून बुधवारी (ता.०९) दुपारी चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली असून नंदागौळ, कन्हेरवाडी, हेळंब, दौंडवाडी या परिसरातील गावात ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडला. दरम्यान परळी - आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून कन्हेरवाडी जवळ पडलेल्या पासाचे पाणी डोंगरातून मोठ्या प्रमाणावर वाहत आल्याने या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला पूल, सिमेंटच्या नाल्यासह वाहून गेला.

या रस्त्यावरील वाहतूक यामुळे बंद पडली होती. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पावसाळ्याच्या अगोदर या पुलाचे काम होणे आवश्यक होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. शहरापासून कन्हेरवाडी गावाचा संपर्क तुटला असून सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT