file photo 
मराठवाडा

परभणी : भौतिक सुविधा नसलेल्या शाळांवर होणार कारवाई-  शिवानंद टाकसाळे 

गणेश पांडे

परभणी ः परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये भौतिक सुविधा आढळून न आल्यास त्यांच्यावर शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली यासाठी त्यांनी संबंधित विभागांना सोमवारी (ता.आठ) आदेशही काढले आहेत.

परभणी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे विशेष प्रयत्न करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत सर्वच शाळांमध्ये स्वच्छतागृह, मुतारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळाचे मैदान, आवार भिंत, स्वयंपाकगृह, उताराचा रस्ता, गरजेनुसार वर्गखोल्या, ब्लॅक किंवा ग्रीन बोर्डाची सुविधा, विद्युत सुविधा, अग्निशमन यंत्र, वैद्यकीय प्रथम उपचार पेटी इत्यादी सारख्या भौतिक सुविधा आवश्यक असणार आहेत.

सदरील शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा परिषद शाळेसाठी ता. 5 मार्च ते ता. 20 मे या कालावधीमध्ये तर ता.5 मार्च ते ता. 10 जून या कालावधीमध्ये  खासगी शाळांना आपल्या भौतिक सुविधांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या कडे कळवावी लागणार आहे. ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच भौतिक सुविधांच्या उपलब्धते बाबत कार्यवाही करणे अपेक्षित असणार आहे.

--पॉईन्टर--

  • - जिल्हा परिषदे बरोबर खाजगी आणि विना अनुदानित शाळांचाही समावेश
  • - गट शिक्षण अधिकाऱ्यांचे पथक करणार जिल्ह्यातील शाळांची तपासणी
  • - शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रमाणे होणार अंमलबजावणी

खाजगी, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांसाठी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांची तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. ती सर्व शाळांची माहिती एकत्रित करणार आहेत. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांचा चेहरा - मोहरा बदलण्यास मदत होणार आहे.

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT