file photo 
मराठवाडा

परभणी प्रशासनाचे अॅक्शन मोड अॅक्टीव्हेट; शहरभरात दंडात्मक कारवाईचा धडाका

गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गानंतर शहरातील नागरीकांचा हलगर्जीपणाचा कळस झाला होता. कुणीही कुठेही विनामास्क फिरणे, गर्दी जमा करणे असे प्रकार घडू लागल्याचे वृत्त सकाळ ने सोमवारच्या अंकातून समोर आणले होते. त्यावर प्रशासनाने तातडीने दखल घेत सोमवारी (ता.22) सकाळपासूनच शहरातील विविध भागात दंडात्मक कारवाई सुरु केली. स्वता उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी इतकेच काय तर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचेही अधिकारी रस्त्यावर कारवाई करतांना दिसत होते.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरसुध्दा सर्वसामान्य नागरिकांसह व्यापार्‍यांनी त्याकडे कानाडोळा सुरू ठेवल्यामुळे उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी सोमवारी (ता.22) सहकार्‍यांसह थेट बाजारपेठेत दाखल होऊन मास्क न वापरणार्‍या व्यक्ती व व्यापार्‍यांविरूध्द दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली.

उपविभागीय अधिकारी डॉ.श्री. कुंडेटकर यांनी सहकार्‍यांसह अचानक सोमवारी दुपारी बारा वाजल्यापासून शिवाजी चौकात दाखल होऊन मास्क न वापरणार्‍या व्यापारी, नागरिकांसह वाहनधारकांना थांबवून समज देवून दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे या चौकातील ये-जा करणारे नागरिक अक्षरशः हादरले. कच्चीबाजार, जनता मार्केट, गुजरीबाजार तसेच अन्यत्र भागात ही कारवाई करण्यात आली. काही दुकानांना थेट भेट देऊन सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे का ? दुकानातील कामगारांनी मास्क घातले आहेत का ? याबाबत तपासणी करण्यात आली. काही व्यापार्‍यांना दंड ठोठावला आहे.

विनामास्क वाहनधारकांविरूध्द मोहीम प्रशासकीय इमारत परिसरात विना मास्क फिरणार्‍या २० जणांविरुध्द कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली. अधिकारी- कर्मचार्‍यांसह विनामास्क फिरणार्‍या रिक्षाचालकांसह वाहनधारकांविरूध्द थेट कारवाई सुरु केली. विनामास्क दिसणार्‍या वाहनधारकाविरध्द थेट दंडात्मक कारवाईचे सत्र अवलंबिले. दुपारी दीड वाजेपर्यंत ७० हून अधिक वाहनधारकांविरूध्द श्री.नकाते यांच्यासह त्यांच्या अधिकारी कर्मचार्‍यांसह महापालिकेच्या पथकांनी कारवाई केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT