file photo 
मराठवाडा

परभणी प्रशासनाचा भोंगळ कारभार : नावात साम्य असल्याने कोरोना बाधित रुग्णालाच सोडले घरी

गणेश पांडे

परभणी ः दोन महिलांच्या नावात साम्य असल्याने कोरोना मुक्त झालेल्या महिलेच्या ऐवजी कोरोनाचा उपचार सुरु असलेल्याच महिलेला घरी सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत घडला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.

परभणी जिल्हा रुग्णालयात गंगाखेड व पूर्णा शहरातील दोन सारख्या नावाच्या महिला कोरोना विषाणु संसर्गाचा उपचार घेत आहेत. त्यातील गंगाखेड येथील महिला कोरोना मुक्त झाल्याने तिची पुर्नतपासणी करण्यात आली. त्यात तिचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आल्याने तिला घरी सोडण्याचा निर्णय उपचार करित असलेल्या डॉक्टरांनी घेतला. परंतू या महिलेच्या नावाशी साम्य असलेली दुसरी पूर्णा शहरातील महिला जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होती. जिल्हा रुग्णाालयातील कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवित पूर्णेतील महिलेलाच तुम्ही कोरोनामुक्त झाला आहात असे सांगून घऱी जाण्यास सांगितले. इतकेच नाही तर या महिलेला तिच्या नातेवाईकांनी वाहनातून घरी देखील नेले. परंतू पूर्णेतील महिलेच्या मुलांने ही चुक तातडीने उपविभागीय महसुल अधिकारी सुधीर पाटील यांच्या लक्षात आणून दिली. 

पूर्णेतील महिलेच्या नावाशी साम्य असणारी गंगाखेड येथील महिला

सुधीर पाटील यांनी हा प्रकार संबधिताच्या कानावर घालून तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. पूर्णेतील या महिलेस ता. १८ जूलै रोजी कोरोना विषाणु संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पूर्णेतील महिलेच्या नावाशी साम्य असणारी गंगाखेड येथील महिला कोरोना मुक्त झाली होती. परंतू तिच्या ऐवजी पूर्णेतील कोरोना बाधित महिलेला केवळ तीन दिवसातच घरी सोडण्यात आले. दरम्यान, पूर्णेतील कोरोना बाधित महिला ही घरी आल्यानंतर परिसरातील इतर महिलांनी व त्यांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्या भेटी साठी गर्दी केली होती. परंतू नंतर जेव्हा रुग्णालयाकडून निरोप मिळाला तेव्हा मात्र पूर्णेतील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या अनेकांची त्रेधा तिरपिट उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील हलगर्जीपणाचे किस्से आता दिवसेदिवस वाढत जात आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

जिल्हा रुग्णालयातील हा हलगर्जीपणा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या पर्यत गेला. त्यांनी ही बाब अतिशय गंभीर असून तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT