Parbhani Agricultural University, Parbhani News  sakal
मराठवाडा

Parbhani News: देशविदेशातील संस्थेशी कृषी विद्यापीठाला जोडण्‍याचा प्रयत्‍न

अमेरिकेतील डॉ. धर्मेंद्र सारस्‍वत यांनी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा

परभणी : देश-विदेशातील कृषी क्षेत्राशी संबंधित नामांकित संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक आणि परभणी कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व विद्यार्थी यांच्यात कृषी संशोधनाबाबत सातत्‍याने विचारांची देवाणघेवाण होणे आवश्‍यक आहे. यामुळे विद्यापीठातील संशोधनास दिशा मिळेल. याकरिता परभणी कृषी विद्यापीठ देश-विदेशातील विविध नामांकित संस्‍थेशी सामंजस्‍य करार करून प्रशिक्षणाच्‍या माध्यमातून विविध विषयांत शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍या कौशल्‍य विकासावर भर दिला जात आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली.(Parbhani News)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषी आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे शास्‍त्रज्ञ वरिष्ठ प्राध्‍यापक डॉ. धर्मेंद्र सारस्‍वत यांनी १२ डिसेंबर रोजी संवाद साधला. संवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषी आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे वरिष्ठ प्रा. डॉ. धर्मेंद्र सारस्‍वत, आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. राजेश्‍वर क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. धर्मेंद्र सारस्‍वत म्‍हणाले की, अनेक भारतीय शास्‍त्रज्ञ विदेशात कृषी संशोधनात योगदान देत आहेत. भारतीय शेती पुढे अनेक आव्‍हाने आहेत. अमेरिकेतील व इतर देशातील कृषी संशोधन क्षेत्रातील ज्ञान व तंत्रज्ञान भारतीय शेतीस उपयुक्‍त ठरू शकते. याकरिता देशविदेशातील संशोधन संस्‍थेशी परभणी कृ‍षी विद्यापीठाची नाळ जोडण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे सांगून त्‍यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन भारतात आणि विशेषतः महाराष्‍ट्रात कशा प्रकारे राबविता येईल, यावर मार्गदर्शन केले.

संशोधन क्षेत्रात आयआयटी मुंबई जास्‍तीत- जास्‍त तळागाळातील संस्‍था व व्‍यक्‍तीशी संबंध जोडण्‍याचा प्रयत्‍न करित असल्‍याचे आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर यांनी सांगितले. प्रास्‍ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी करून दिला. डॉ. सचिन मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT