Latur News
Latur News 
मराठवाडा

थंडीत कुडकुडत झोपले कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी

हरी तुगावकर

लातूर : येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात सोमवारपासून (ता.२७) विद्यार्थ्यानी आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी रात्रभऱ हे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच थंडीत कुडकुडत झोपून राहिले.

पहाटे तीनच्या सुमारास कृषी विद्यापीठाच्या एका पथकाने येऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली पण कुलगुरुंनाच आम्हाला भेटायचे आहे या भूमिकेवर विद्यार्थी ठाम राहिले. त्यामुळे या पथकाला तसेच परत जावे लागले. महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांचाही वापर केला पण विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे.

येथील कृषी महाविद्यालयाचे प्रशासन आणि विद्यार्थ्यात वाद सुरु झाला आहे. यातून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी दिवसभर हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या करून बसले होते. सोमवारी दिवसभर या विद्यार्थ्यांनी `प्राचार्य साहेब एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो`, `शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे`, `स्टुण्डंच पॉवर, नेशन पॉवर ` अशा घोषणा देत  महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला आहे.

प्रवेशद्वारावरच थंडीत कुडकुडत बसून

प्रशासनाकडून होणारा त्रास, विद्यावेतनाचा प्रश्न, वसितगृहात सुविधांचा अभाव, प्रशासनाकडून मिळणारी चुकीची वागणूक अशा अनेक मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत.

सोमवारी दिवसभर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. महाविद्यालयाच्या प्रशासनाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. रात्रभर हे विद्यार्थी प्रवेशद्वारावरच थंडीत कुडकुडत बसून होते. त्यानंतर तेथेच ते झोपले. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास कृषी विद्यापीठाचे एक पथक कृषी महाविद्यालयात आले.

त्यांनी या विद्यार्थ्यांना झोपेतून उठवून चर्चा केली. पण आम्ही कुलगुरुंनाच बोलू अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर हे पथक तेथून निघून गेले. मंगळवारी दिवसभर पुन्हा या विद्यार्थ्यानी आंदोलन सुरुच ठेवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT