Agricultural workshop sakal
मराठवाडा

Parbhani News : कृषी विद्यापीठात दोन दिवसीय कार्यशाळा

डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्यमातून अनेक शेतीची कामे काटेकोरपणे आपण करून शकतो.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ग्राफ्टिंग रोबोटद्वारे पालेभाज्या व फळवर्गीय रोपांचे कलमीकरणाची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच झाली.

कार्यशाळेचे उद्‍घाटन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते झाले. व्‍यासपीठावर साऊथ कोरियाच्या एचआरसी कंपनीचे तज्ज्ञ जेरेमी एच. जे. पार्क व नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाल शिंदे, भाजीपाला संशोधन केंद्राचे डॉ. विश्वंभर खंदारे आदींची उपस्थिती होती.

डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्यमातून अनेक शेतीची कामे काटेकोरपणे आपण करून शकतो. प्रगत देशात यंत्रमानवाच्‍या मदतीने अनेक शेतकामे केली जातात. भारतातही डिजिटल शेती तंत्रज्ञानाचा विकासाकरिता प्रयत्‍न केला जात आहे. रोबोटद्वारे पालेभाज्‍या व फळवर्गीय रोपांचे कलमीकरण करणे शक्‍य होत आहे, सदर यंत्रमानवाच्‍या साहाय्याने कमी वेळेत दर्जेदार रोपांचे कलमीकरण होते.

नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी शेतकरी, नर्सरी उद्योजक यांना माहिती दिली. कार्यशाळेत हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक जेरेमी एच. जे. पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी मार्गदर्शन करुन टोमॅटो व वांगी रोपांच्या रोबोटद्वारे कलमीकरणाचे प्रात्याक्षिक करुन दाखविले. कार्यशाळेसाठी २५ नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी सहभाग नोंदविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT