परभणी : नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या फेरीत सहभागी नागरिक ... 
मराठवाडा

Video : नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ परभणीत मोठी फेरी

गणेश पांडे

परभणी : नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी कृती समितीच्यावतीने परभणी शहरात सोमवारी (ता.३०) मोठी फेरी काढण्यात आली. शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही फेरी काढण्यात आली. 

>नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ परभणी शहरातील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्यावतीने सोमवारी (ता.३०) दुपारी साडेबारा वाजता शनिवार बाजार मैदानातून ही फेरी सुरु करण्यात आली. शनिवार बाजार, नानलपेठ, शिवाजी रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवीचौक, स्टेशन रोड मार्गे ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आली. फेरीत महिलांचा सहभाग मोठा होता. लांबच लांब तिरंगा घेवून फेरीत युवक सहभागी झाले होते. फेरीच्या सुरवातीला बालाजी मंदिराचे महंत यांच्यासह अनेक मंदिराचे महंत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, आमदार मेघना बोर्डीकर, विश्वहिंदू परिषदेचे आनंत पांडे यांच्यासह बहुतांश व्यापारी सहभागी झाले होते. त्या ठिकाणी राष्ट्रगीताने फेरीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे ,माजी आमदार मोहन फड, आमदार मेघना बोर्डीकर, आनंत पांडे ,आनंद बनसोडे, सुनील देशमुख, सादिक इनामदार, गणेशराव रोकडे, अशोक डहाळे ,राजकुमार भांबरे, प्रल्हादराव कानडे

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
ता. २० डिसेंबर रोजी नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काढण्यात आलेल्या फेरी दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.३०) समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

तिरंगा ध्वज सर्वांचे आकर्षण ठरला
फेरीतील सर्वांच्या हातात तिरंगा व भगवा ध्वज देण्यात आला होता. विविध घोषणाची फलक देखील महिला व मुलींच्या हातात होती. वेगवेगळ्या घोषणा देत सर्व जन सहभागी होत होते. फेरी दरम्यान लांबच लांब ध्वज घेवून नागरीक सहभागी झाले होते. हा ध्वज सर्वांचे आकर्षण ठरला होता. त्या बरोबर परभणी शहराची ओळख असलेल्या गोंधळ या लोककलेचे सादरीकरण देखील फेरी दरम्यान करण्यात आले होते.


दुपारपर्यंत बाजारपेठ बंद
नागरीकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठ सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. फेरी संपल्यानंतर बाजारातील दुकाने उघडण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT