file photo 
मराठवाडा

परभणी : कुपटा येथिल कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : कुपटा ( ता.सेलू ) येथील तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या गावच्या एक किलो मीटरच्या परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका पशुधन विकास कार्यालयांतर्गत जवळपास चारशे दहा कोंबड्या मारण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डाॅ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली.

कुपटा ( ता. सेलू ) येथील कुपटा येथिल कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमूळेच झाल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या शुक्रवारी ( ता.१५ ) रोजी प्राप्त आदेशानुसार कुपटा ( ता.सेलू ) येथील बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी तपासणीतून  झालेली आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजनांसाठी कुपटा ( ता. सेलू ) येथिल पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शंभर मिटर अंतरावरील अखाड्यावरच्या शेकडो कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्यानंतर शनिवारी ( ता. १६ ) रोजी संबधित विभागाच्या कर्मचार्‍यांनी कोंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेतले.

दिवसभरात जवळपास चारशे दहा कोंबड्या नष्ट केल्या आहेत. या प्रसंगी तहसिलदार बालाजी शेवाळे, पशुधन विकास अधिकारी डाॅ.प्राजक्ता कुलकर्णी,डाॅ. कपिल भालेराव, डाॅ.सय्यद मोहसिन, डाॅ. शिरिष गळाकाटू यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं... आंदोलनकर्त्यांची धरपकड

Pune: पुण्यात नव्या महामार्गावर प्रतिकिलोमीटर ९ रुपयांप्रमाणे टोल; जिल्हाधिकारी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलवले; दिल्ली पोलिसांची माहिती

'OMG 2 ची कथा माझी होती, पण श्रेय दिलं नाही' परेश रावल अक्षय कुमारबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले...

Sonam Wangchuk Indira Gandhi : सोनम वांगचुक यांच्या वडिलांचं उपोषण अन् इंदिरा गांधींची लेहला धाव; १९८४ मधील तो ऐतिहासिक प्रसंग काय होता?

SCROLL FOR NEXT