file photo 
मराठवाडा

परभणी : गंगाखेड तालुक्यावर ' प्रभारीराज ', अनेकांची कामे खोळंबली

प्रा. डाॅ. अंकुश वाघमारे

गंगाखेड  : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका हा सर्वच बाबतीत अग्रेसर म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील विविध विभागाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी प्रशासनातर्फे विविध कार्यालयाची स्थापना केली. परंतु या विविध कार्यालयातील प्रमुख पदाचा कारभार हा प्रभारीच पाहत आहेत. कोविड -१९ च्या महत्वपूर्ण काळातही गंगाखेड तालुक्यावर 'प्रभारीराज' आहे.

तालुक्याचा कारभार सुरळीतपणे चालावा, तालुक्यातील नागरिकांचे विविध कामे, प्रश्न तात्काळ सोडविले जावेत यासाठी शासनाच्या वतीने विविध कार्यालये स्थापन केली व या कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी कार्यालय प्रमुख नियुक्त केले गेले. परंतु गंगाखेडची वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे पुढे काय झाले ? हा शहरवासीयांना पडलेला प्रश्न आहे. कारण गंगाखेड तालुक्यातील महत्वपूर्ण कार्यालयाच्या प्रमुख पदाचा कारभार हा 'प्रभारी' वरच चालत आहे. तालुक्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांची बदली झाल्यामुळे त्या पदावर प्रभारीच कारभार पाहतात.गंगाखेड  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांची बदली पुणे येथे झाल्यामुळे त्यांच्या रिक्त पदावर पूर्णाचे मुख्याधिकारी पंकज पाटील हे अतिरिक्त कारभार पाहतात.

तालुक्याचा प्रभारी राज

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केदार सोनवणे यांची बदली पूर्णा येथे झाली परंतु अतिरिक्त कारभार त्यांच्याकडेच सोपवला आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा संतोष राजूरकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला आहे. उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथील वैद्यकीय अधीक्षक पद हे प्रभारीच चालत होते.काही दिवसापूर्वीच आरोग्य प्रशासनाने डॉ.रमेश पवार यांची नियुक्ती केली. परंतु रुजू होऊन त्यांनी चार्ज डॉ. हेमंत मुंडे यांच्याकडे सोपवला आहे.

तालुक्यातील ' प्रभारीराज' थांबवणार का असा प्रश्न नागरिकांतून समोर आहे

पोलीस उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले यांची बदली अमदपुर येथे झाली असून त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. भूविकास स्थापत्य उपविभाग क्रमांक-३ चा अतिरिक्त कारभार भूविकास उपविभागीय अधिकारी बी.पी.पोले यांच्याकडे आहे. तसेच माजलगाव कालवा विभाग क्रमांक-७ चा अतिरिक्त कारभार शाखा अभियंता जी.एस. कोचे हे पाहतात. तालुक्यातील महत्वपूर्ण कार्यालयाचा कारभार प्रभारीच पहात असल्यामुळे याचा फटका कार्यालयासह, नागरिकांना व तालुक्याचा विकासास बसला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गंगाखेड तालुक्यातील ' प्रभारीराज' थांबवणार का असा प्रश्न नागरिकांतून समोर येत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT