‘विनाहेल्मेट’ कारवाईला  esakal
मराठवाडा

Parbhani : ‘विनाहेल्मेट’ कारवाईला आता व्यापक रूप ;परभणीत तिसऱ्या दिवशी ५४ जणांवर कारवाई

तालुकास्तरावरही होणार तपासणी मोहीम सुरू

राजेश नागरे

परभणी : शहरात हेल्मेट न घालता दुचाकीवर फिरणाऱ्यांवर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. २८) कारवाईचा तिसरा दिवस असून, या दिवशी तब्बल ५४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. आता ही कारवाई व्यापक रुप घेणार असून, शहरासह तालुकास्तरावर देखील तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

परभणी शहरात वाहतुकीला शिस्त नाही. वाहनधारक कुठे- कसे वाहन चालवितील, याची शाश्वती नाही. त्याच बरोबर कोणत्याही वाहतूक नियमांचे पालन न करता सुसाट दुचाकी पळविल्या जातात. यामुळे मोटारसायकल अपघातात अनेक बळी जात आहेत. त्यामुळे अपघातात परभणीचे नाव अधिक गडद होताना दिसत आहे.

वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्यावतीने सातत्याने जनजागृती केली जाते. परंतु, आता लोकांना शिस्त लागावी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून परभणी शहरात कारवाई सुरु आहे. सुरुवातील शासकीय कार्यालयांत हेल्मेट न घालता येणारे कर्मचारी व अभ्यंगतावर कारवाई केली जात आहे.

तिसऱ्या दिवशी तब्बल ५४ जणांवर कारवाई करण्यात आली. यात पोस्ट कार्यालयात २१, कृषी कार्यालयात १३ तर महापालिकेत २० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर ९ अवैध अॅटोरिक्षांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT