file photo 
मराठवाडा

परभणी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडूनच नागरीकांना गुलाबपुष्प; विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात गांधीगीरी

गणेश पांडे

परभणी ः शहरात विनामास्क वावरणाऱ्या नागरीकांना मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.15) शहरात पायी फिरत विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना गुलाबपुष्प व मास्क देवून जनजागृती केली. 

परभणी शहरात गेल्या दोन दिवसात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीनंतर सोमवारी (ता.15) शहरातील बाजारपेठ उघडण्यात आली. नित्या प्रमाणे सर्व व्यवहार सुरुळीत सुरु झाल्यानंतर स्वता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी शहरातील दर्गा परिसरापासून जनजागृतीस सुरुवात केली.  दर्गारोड, हनुमानचौक, सुभाषरोड, शिवाजी चौका तसेच जनता मार्केटपर्यंत या अधिकार्‍यांनी मास्कविना फिरणार्‍या नागरीकांना थांबवुन गुलाब पुष्प व मास्क दिले. बाजारपेठेतील काही व्यापारी देखील विनामास्कचे आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मास्क वापरण्याच्या सुचना देखील केल्या. काही भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते तसेच स्टॉलधारकांनाही मास्क देवून जनजागृती केली. जिल्हाधिकारी स्वता रस्त्यावर उतरून लोकांना मास्कचे महत्व पटवून सांगत असल्याने अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे कौतूक केले.

मास्क नसेल तर आर्थिक दंड बसेल

संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात कोरोना बांधित रुग्ण संख्येत मोठी वाढ आहे. यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. बाजारपेठेत विनामास्कने नागरिक फिरू लागले आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक, व्यापार्‍यांनी सतत मास्कच वापरावा, विना मास्क असलेल्या ग्राहकास दुकानात प्रवेश देऊ नये, तसेच व्यापार्‍यांनी व तेथील कामगारांनी मास्कचा वापर सातत्याने करावा, मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT