file photo 
मराठवाडा

परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता. १३) जाहीर केले. ता. १४ पासून ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी मंगळवारी (ता. १४) संपत आला होता. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत दोन दिवसांपूर्वीच निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार ता. ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन राहणार असल्याचे घोषित केले होते. परंतु, काही जिल्हे ग्रीन झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यात शिथिलता देण्यात येऊ शकते, असे बोलल्या जात होते. परंतु, सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दुपारी नवीन आदेश काढले आहेत. यात जिल्ह्यातील लॉकडाऊन ता. ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात येत्या १५ दिवसांसाठी परत लॉकडाऊन होणार आहे, हे मात्र निश्चित.

व्हॉटसअप ग्रुपची द्यावी लागणार माहिती
जिल्हयातील व्हॉटसअप ग्रुपची माहिती जिल्हा प्रशासन गोळा करत असून त्यासाठी संबंधीत ग्रुप ॲडमीनला त्याच्या ग्रुपची माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणतीही अफवा पसरविली जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यापासून सोशल मिडियाच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश पसरविले जात आहेत. त्यात व्हॉटसअप हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे. या माध्यमातून लोकांनी ग्रुप तयार केले असून या ग्रुपवर शेकडो लोक एका ठिकाणी असतात. त्यामुळे एखादी चुकीची माहिती काही सेकंदातच संपूर्ण राज्यात पसरते. त्यामुळे सध्याच्या कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या परिस्थितीत कुठहीली चुकीची माहिती लोकांपर्यत जावून लोक भयभित होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता.१३) व्हॉटसअप ग्रुपच्या ॲडमीनकडून त्यांच्या ग्रुपची माहिती संकलीत करणे सुरु केले आहे. त्यात त्या ग्रुपचे नाव, ग्रुपच्या ॲडमीनची संख्या, ग्रुपमधील सदस्यांची संख्या त्यांचे मोबाईल नंबर याची माहिती विचारली जात आहे. तसेच माहिती पूर्ण भरल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र देखील येत आहे. त्यात या ग्रुपवर कोणतीही खोटी माहिती पसरविली जाणार नाही त्याची काळजी मी स्वता घेतो. असे झाल्यास मी शिक्षेस पात्र राहिल असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Agriculture Loss By Rain : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश

Pune News : निधी येऊनही शहरात पाणी का साठते? केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडून प्रशासनाची झाडाझडती

SCROLL FOR NEXT