file photo 
मराठवाडा

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरुन परभणीत गोंधळ !

गणेश पांडे

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी एकमत न झाल्याने सोमवारी (ता. तीन) होणारी निवड पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या नावाला वरिष्ठांची सहमती मिळत असल्याचे लक्षात येताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. आता ही निवड प्रक्रिया ता. १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या परभणी जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. तीन) एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात घेण्यात आली. प्रदेश शाखेच्या वतीने शिरीष बोराळकर व गंगाधरराव जोशी हे दोघे या निवडणुकीसाठी परभणीत आले होते. सकाळी ११ वाजता बैठकीस प्रारंभ झाला. परंतु, सुरवातीपासून बैठकीत उमेदवारीवरून वादंग उभे राहिले. विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या नावाला विरोध होत होता. त्यांना परत पदावर घेऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यांच्या ऐवजी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे नाव समोर केले जात होते. परंतु, वाद वाढल्याने दोन्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही काळ बैठक थांबविली.

ग्रामीणसाठी सात, तर शहरासाठी पाच अर्ज
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी एकूण सात अर्ज आले होते. त्यात डॉ. सुभाष कदम, अभय चाटे, गणेशराव रोकडे, रामप्रभू मुंढे, श्रीराम मुंढे, बाबासाहेब जामगे, राजश्री जामगे, अशोक खताळ यांची नावे होती. तर महानगराध्यक्षपदासाठी आनंद भरोसे, बाळासाहेब भालेराव, प्रमोद वाकोडकर, मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे यांची नावे होती. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अभय चाटे यांचे नाव समोर येत असल्याचे समजाताच बैठकीस हजर असणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. अभय चाटे यांची परत जिल्हाध्यक्षपदी निवड करू नये, अशी मागणी होत होती. अभय चाटे यांच्या नावाला माजी मंत्री पंकजा मुंढे यांचे समर्थन मिळत असल्याने दबाव वाढला असल्याची चर्चा बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत होती. त्यामुळे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, डॉ. सुभाष कदम, माजी आमदार मोहन फड किंवा जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यापैकी कुणा एकाकडे जिल्हाध्यपदाची जबाबदारी द्यावी, अशीदेखील मागणी जोर धरू लागली होती. तर महानगराध्यक्षपदासाठी मधुकर गव्हाणे यांचे नाव समोर येत असल्याने त्यांच्याही नावाला विरोध होत होता. या ठिकाणी प्रमोद वाकोडकर यांच्याकडे महानगराध्यपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी होत होती.


पुढील निवड प्रक्रिया १२ फेब्रुवारीला
परभणी महानगराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी आज झालेल्या बैठकीत एकमत झाले नाही. या संदर्भात आम्ही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने ही निवड प्रक्रिया पुढे ढकण्यात आली आहे. ती आता १२ फेब्रुवारी रोजी होईल. निवड प्रक्रियेसाठी कुणाचाही दबाव आला नाही.
- शिरीष बोराळकर, निवडणूक अधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT