file photo
file photo 
मराठवाडा

परभणी : खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा; राजेश विटेकर यांना कर्मचारी करत होती ब्लॅकमेल

कृष्णा पींगळे

सोनपेठ ( जिल्हा परभणी ) : सोनपेठ पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या महातपुरी येथील एका शिक्षण संस्थेवर काम करणारी महिला कर्मचारी व तिच्या कुटुंबियांकडून लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी होत असल्यामुळे व वारंवार होणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर यांनी अखेर त्या महिला कर्मचाऱ्याविरुद्ध फिर्याद दिल्यामुळे तीन महिला आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथे असणाऱ्या एका शिक्षण संस्थेत काम करणारी महिला कर्मचारी उषा तुकाराम हाटे तिची बहीण सुनीता तुकाराम हाटे व आई सुमित्रा तुकाराम हाटे या गेल्या अनेक दिवसांपासून राजेश विटेकर व त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असल्याची तक्रार ता. १५ मार्च रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे. 

संबंधित महिला, तिची बहीण व आई यांनी आतापर्यंत विटेकर यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच इतरांच्या विरुद्ध देखील खोट्या तक्रारी करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. यासर्व बाबींमुळे राजेश विटेकर यांनी याआधीच तीन महिलांच्या विरुद्ध मानहाणीचा खटला न्यायालयात दाखल केला आहे. हा खटला वापस घ्यावा तसेच २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी म्हणून आरोपी महिलांनी ता. १४ मार्च २०२१ रोजी महातपुरी ता. गंगाखेड येथील प्रल्हाद शिंदे यांच्या मार्फत निरोप दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास महिला ही आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेणार असल्याचे धमकी देखील देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. 
त्यावरून सोनपेठ पोलिसांनी उषा हाटे, सुनीता हाटे व सुमित्रा हाटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सोनपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने हे करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT