crop damage  sakal
मराठवाडा

Parbhani : चाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका

मानवत तालुक्यात झालेल्या पावसाचा परिणाम, नुकसानभरपाईसह पीकविमा मंजूर करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मानवत : तालुक्याला मागील दोन दिवसांत परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा चाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. विशेषतः काढणीस आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तालुक्यात एकूण ३७ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यात सर्वाधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून, एकूण २० हजार ११० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. त्या खालोखाल १२ हजार ८९६ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली. सुरवातीला जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीनंतर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ २० टक्के पाऊस झाल्याने तूट राहिली.

यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने पिके बहरली. या वर्षी चांगले उत्पन्न होण्याची अपेक्षा होती. परंतु, ऑक्टोबर महिन्यात परतलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली. गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाने सोयाबीन व कापूस या पिकांना मोठ्या फटका बसला. सध्या सोयाबीन कापणी व काढणी सुरू असून, पावसाने सोयाबीनचा दर्जा खालावत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

तसेच वेचणीसाठी आलेल्या कापसाचे नुकसान होत आहे. या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी देण्यासाठी आंदोलन उभा करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे गोविंद घाडगे, युवा सेनेचे तालुका प्रमुख कृष्णा शिंदे, बबलू कदम, माधव नानेकर, गजानन बारहाते, ॲड. सुनील जाधव, राष्ट्रवादी युवकचे प्रताप पिंपळे, कैलास बनगर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT