file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्याच्या सीमा बंद !

गणेश पांडे

परभणी : पुणे, मुंबई जिल्ह्यासह इतर जिल्हयात नोकरी निमित्त गेलेले शेकडो लोक परत आप - आपल्या गावात परत येत आहेत. अश्या परिस्थितीत जिल्हयात ‘कोरोना’ विषाणूची लागण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सोमवारी (ता.२३) दिले आहेत. ही सीमा बंदी ता. ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

राज्य शासनाने शासनाने ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधत्मक कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनामध्ये जिल्हा सीमा बंदी हा देखील निर्णय सोमवारी (ता.२३) जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील नागरीकही परभणी जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरिक, प्रवाशी यांच्या मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई
 त्या करिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. या साठी परभणी जिल्ह्यातील सर्व सीमा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिक नसलेल्या कोणत्याही जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे - मुंबई व इतर महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, असे ही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

कापुस, तुर खरेदी केंद्र राहणार बंद

परभणी : ‘कोरोना’ विषाणुला प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील कापुस, तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणुला प्रतिबंध म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. शासकीय, खासगी अस्थापना बंद झाल्या आहेत. सध्या कापुस, तुर विक्री सुरु असल्याने त्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी जिल्ह्यातील कापुस, तुर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी घेतला आहे. ता.३१ मार्चपर्यंत खरेदी केंद्र बंद राहणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

Latest Marathi News Updates : वडगाव मावळमध्ये गोळीबारात एक व्यक्ती जखमी

Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांच्या एका वाक्याने भाकरी फिरणार? गोकुळ दूध संघात सभासदांचे गट्टा मतदान असलेल्या आबाजी पुढच्या निवडणुकीत कोणासोबत

SCROLL FOR NEXT