file photo 
मराठवाडा

कोरोनाचे सावट : परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर रस्त्यावर उतरले

गणेश पांडे

परभणी : विना मास्क फिरणारे नागरिक, सामाजिक अंतराचा उडालेला फज्जा, वारंवार आवाहन करून तसेच निर्बंध लावू नही मिळत नसलेला प्रतिसाद पाहून अखेर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे स्वतः च रस्त्यावर उतरले. मंगळवारी (ता.23) सकाळी बाजारपेठेत फिरून त्यांनी व्यापारी विक्रेते नागरिकांना हात जोडून विनंती केल्याचे चित्र होते तर नियम पायदळी तुडविणा-यांना त्यांनी दंडाचा दणका दिला तसेच विना मास्क फिरणाऱ्या अनेकांची आरटीपीसीआर टेस्टसाठी रवानगी केली.

जिल्ह्यातही कोरोणाचा संसर्ग वाढू लागलेला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अनेक निर्बंध लागू केले आहेत. विना मास्क फिरू नये, सुरक्षित अंतर राखावे, असे नागरिकांना वेळोवेळी आवाहन करीत आहेत. अंमलबजावणी यंत्रणेला देखील दंडात्मक कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत. तरी सुद्धा यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचा परिणाम दिसून येत नाही. प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पुढारी किंवा राजकीय कार्यकर्ते बडे अधिकारी देखील सुरक्षा नियमांची पायमल्ली करीत असल्याचे अनेक वेळा दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणा अशा व्यक्तींवर कारवाई देखील करीत नसल्याचे चित्र सर्वसामान्य नागरिकांकडे उभे राहिलेले आहे.

जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री मुगळकर हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. विसावा काँर्नर, गांधी पार्क गुजरी बाजार, शिवाजी चौक, बसस्थानक आदी परिसरात जाऊन त्यांनी विना मास्क फिरणारे नागरिक, व्यापारी, विक्रेते यांना सुरक्षा नियमांची जाणीव करून दिली. अनेक दुकानांना त्यांनी भेटी देऊन अक्षरशा हात जोडून विनंती केली. सॅनिटायझर ठेवा, स्वतःसह नोकर-चाकरांना मास्क अनिवार्य करा, सुरक्षित अंतर याची खबरदारी घ्या अशी सूचना ते देत होते. जिल्हाधिकाऱ्यांचा अचानक आलेल्या ताफ्याने अनेकांची धांदल उडाली. घाईगडबडीने मास्क लाणणे, सँनिटायझर ठेवणे असे व्यापारी करू लागले. काहींना ते जमले नाही अशांना मात्र दंडाचा दणका मिळाला.

दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड

दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड लावल्याची माहिती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे यांनी दिली त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विना मास्क भरणाऱ्या काहींच्या आरटीपीसीआर चाचण्या देखील करण्यात आल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरून कारवाई करीत आहेत. तर महानगरपालिकेसह संबंधित अनेक अधिकारी अजूनही आपल्या केबिनमध्ये अडकून पडल्याचे चित्र आहे.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT