file photo 
मराठवाडा

परभणी : जिल्हाधिकाऱ्याने सिव्हील सर्जनचे कान टोचले; जिल्हा रुग्णालयात समन्वयाचा अभाव 

गणेश पांडे

परभणी ः येथील जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे एक ना अनेक किस्से गेल्या वर्षभरापासून बाहेर पडत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव काय झाला आणि जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. शनिवारी (ता. तीन) पहाटे झालेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर तर चक्क लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या समोरच गलथान कारभाराचे पितळ उघडले पडले. संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सकांची सर्वांसमोरच कानउघडणी करावी लागली.

परभणी जिल्हा रुग्णालयातील कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. कोण कोणत्या ड्युटीवर आहे याची माहिती खुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांनाही नसल्याची धक्कादायक बाब या प्रकारमुळे उघडकीस आली. सारी कक्षात अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यु झाल्यानंतर उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधिक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुळीक यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जावून पाहणी केली. यावेळी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार सर्वासमोर आला. सारी कक्षात झालेल्या प्रकारानंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पळून गेले. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी संपप्त झाले.

डॉक्टरांना जवाबदाऱ्याच वाटप नाहीत
कोरोना सारख्या जागतिक महामारीतही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले नसल्याचे या बैठकीत समोर आले. एकही फिजीशियन कोरोना व सारी कक्षाकडे फिरकत नसल्याची बाबही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.  बैठकीस उपस्थित काही फिजीशियन यांनी आपल्याला कुठे जायचे याचे लेखी आदेश नसल्याचेही सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी संपत्प झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वता केले कामाचे वाटप
जिल्हा रुग्णालयातील एक एक भोंगळ कारभार समोर येत असल्याने संपप्त झालेल्या जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्येक फिजीशिनयला जबाबदारींचे वाटप करून दिले. काही कक्षात साहित्याची कमतरता असल्याचे समजल्यानंतर त्या वस्तू तातडीने त्या कक्षात पाठविण्याची व्यवस्था करा असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

SCROLL FOR NEXT