file photo
file photo 
मराठवाडा

वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा !

कैलास चव्हाण

परभणी : जनता ‘कोरोना’मुळे संकटात असताना सोमवारी (ता. ३०) रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने तडाखा दिला. परभणी जिल्ह्यात सर्वत्र विजेचे तांडव आणि जोराचा पाऊस रात्रभर अधूनमधून पडतात होता. तसेच काही वेळ गारांचादेखील मारा झाला.
परभणी जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पावसाळी हजेरी लागत आहे. अख्खा हिवाळा ढगाळ वातावरणात आणि हलक्या पावसात गेल्यानंतर अर्धा उन्हाळादेखील अशाच वातावरणात संपला आहे. मागील १५ दिवसांत तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली होती. तसेच सांयकाळी आभाळ भरून येत असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजता वारे वाहण्यास सुरवात झाली. सातच्या दरम्यान, वादळी वाऱ्याने चांगलेच रौद्ररूप धारन केले. तुफानी वाऱ्याने सर्वत्र हाहाकार उडवला. 

घरांवरील उडाली पत्रे 
परभणी शहरी भागात वाऱ्यामुळे अनेक फलक कोसळून पडले, झाडांच्या फांद्यादेखील मोडून पडल्या. संपूर्ण शहरात नुसता धुरळा उडाला. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. तसेच बाजारपेठ सुरू नसल्यामुळे फार काही नुकसान शहरी भागात झाले नाही. हेच वारे ग्रामीण भागातदेखील होते. मात्र, ग्रामीण भागात नुकसान अधिक झाले आहे. शेतआखाड्यांससह गावातील घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. अनेकांनी नुकत्याच लावलेल्या ज्वारीच्या कडब्याच्या गंजी वाऱ्यामुळे उडून गेल्या आहेत. वारे शिरल्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर काही वेळातच धोधो पावसाला सुरवात झाली. परभणी शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, सोनपेठ, पूर्णा आदी तालुक्यांतच एकाच वेळी पावसाला सुरवात झाली. त्यानंतर रात्री दहा वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. अगदी पावसाळ्यासारखा रात्रभर पाऊस पडत होता. पावसाच्या सोबतीला विजांचा कडकडाट होता. रात्री उशिरापर्यंत  विजांनी तांडव केले.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात ११४ जण ‘होम कॉरन्टाईन’

पूर्णा, सेलू, जिंतूरमध्ये पाऊस 
पूर्णा तालुक्यातदेखील साडेसातच्या दरम्यान, पावसाला सुरवात झाली होती. या पावसामुळे तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतआखाड्यावर वास्तव्यास असणाऱ्यांचे हाल झाले. सुगीचे दिवस असल्याने अनेकांचा मुक्काम शेतात आहे. तसेच शेळ्या, मेंढ्या या फिरस्ती असल्याने या प्राण्यांनादेखील रात्रीच्या पावसाची झळ सोसावी लागली. ताडकळस शिवारात पावसाने झोडपून काढले. सेलू तालुक्यात आठच्या दरम्यान, जोराचा पाऊस झाला. वालूर परिसरात याच वेळी चांगला पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील जिंतूर शहर, चारठाणा, बोरी या भागातदेखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

पहाटे गारपीट
परभणी जिल्ह्यात रात्रभर अधूनमधून पाऊस सुरू होता. पहाटे पाचच्या दरम्यान, पाच मिनिटे गारांचा पाऊस झाला. हा पाऊस परभणी शहर आणि परिसरात होता.

हेही वाचा - २४ तास वैद्यकीय सेवा सुरू ठेवा : जिल्हाधिकारी

मंडळनिहाय पाऊस
परभणी शहर १२, परभणी ग्रामीण ११, शिंगणापूर २७, दैठणा १०, झरी बुद्रुक    १२, पेडगाव १०.६०, पिंगळी १३, जांब १४, (परभणी तालुका सरासरी १३.७०), पालम १, पूर्णा २२, ताडकळस २४, चुडावा १२, लिमला १४, कात्‍नेश्‍वर १२, (पूर्णा तालुका सरासरी १६.८०) गंगाखेड २, राणीसावरगाव १, महातपूरी १९ , (गंगाखेड तालुका ५.५०) सोनपेठ १४, आवलगाव ९, (सोनपेठ तालुका ११.५०), सेलू ५, देऊळगाव ८, कुपटा २, वालूर ५, चिकलठाणा ६ (सेलू तालुका ५.२०), पाथरी २, बाभळगाव ५, हादगाव २, सेलू तालुका ३, जिंतूर ५, सावंगी म्हा ४, बोरी ६, चारठाणा ४, अडगाव बुद्रुक ५, बामणी १० (जिंतूर तालुका सरासरी  ५.६७), मानवत २, केकरजवळा ११, कोल्हा १९, (मानवत तालुका १०.६७). एकूण जिल्ह्यात ८.०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हरबरा, आंब्याचे नुकसान
परभणी जिल्ह्यात सध्या हरबरा काढणी सुरू आहे. तसेच ज्वारीचीदेखील कापणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा फळबागांना मोठा फटका बसला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT