file photo
file photo 
मराठवाडा

आबब...! एकाच दिवशी ७१ कॉपीबहादरांवर कारवाई

कैलास चव्हाण

परभणी : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान, सोमवारी (ता. २४) भौतिकशास्त्राच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायाला मिळाला. पूर्णा तालुक्यात दोन परीक्षा केंद्रांवर तब्बल ७१ परीक्षार्थीं कॉपी करताना अढळून आले, तर अन्य दोन केंद्रांवर तीन कॉपी केस करण्यात आली. ही कारवाई विशेष भरारी पथकाने केली आहे.

जिल्ह्यात ता. १८ पासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झालेला आहे. पहिला दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. त्या दिवशी १५ कॉपी केस करण्यात आल्या आहेत. तर ता. २० रोजी झालेल्या मराठीच्या पेपरला एक, ता. २२ रोजी झालेल्या हिंदी विषयाच्या पेपरला एक कॉपी केस झाली. सोमवारी झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला मात्र, कॉप्याच कॉप्या आढळून आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.


पूर्णेत तब्बल ३८ परीक्षार्थींना पकडले
मानवतचे गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त पथकात पाथरीच्या शिक्षण विस्तार अधिकारी मेहरुनीसा बेगम अन्वर खान, सेलूचे मुख्याध्यापक सतीश कांबळे, मानवत गटसांधन केंद्राचे डी. एस. कापसे यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे. या पथकाने सोमवारी पूर्णा शहरासह तालुक्यातील काही केंद्रांना भेटी दिल्या असता कॉपीचे प्रकार समोर आले. पूर्णा शहरातील संस्कृती कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल ३८ परीक्षार्थी, तर याच तालुक्यातील कावलगाव येथील जय जवान जय किसान कनिष्ठ महाविद्यालयात ३० परीक्षार्थी कॉपी करताना अढळून आले. बामणी (ता. जिंतूर) येथील ब्रम्हेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात दोन आणि राज्यशास्त्र विषयाच्या पेपरला चारठाणा (ता. जिंतूर) येथील संत जनार्दन कनिष्ठ महाविद्यालयात एकाला कॉपी करताना पकडल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी दिली.

हेही वाचा- परभणी- मुदखेड दुहेरीकरणाने वाढणार रेल्वेंची गती
 
‘त्या’ केंद्रांवर विशेष लक्ष
पेडगाव (ता. परभणी) येथील दोन परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या पेपरला शिक्षकांनी उत्तरे सांगितल्याची चर्चा झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देत पेडगावसाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. तसेच पेडगाव येथील केंद्रावर परीक्षेदरम्यान, अधिकारी सातत्याने भेटी देत असून एक विशेष पथक तळ ठोकून आहे.

२३ हजारांवर विद्यार्थी देताहेत परीक्षा
बारावीसाठी यंदा ६१ केंद्र आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचे नऊ हजार ५४८, कला शाखेचे ११ हजार ६५४, वाणिज्य शाखेचे दोन हजार ३४१, तर एमसीव्हीसी ६१५, असे एकूण २३ हजार ८०६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. १८ मार्चपर्यंत परीक्षा चालणार आहे. परीक्षेसाठी ६१ बैठे पथक व महसूलचेदेखील २३ पथक स्थापन करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT