महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ई-ग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीमध्ये परभणी जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे.  
मराठवाडा

'ई-ग्रामस्वराज' प्रणालीमध्ये परभणी जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

गणेश पांडे

परभणी : महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ई-ग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीमध्ये (Public Financial Management System) परभणी जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना १५ व्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी ई-ग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने खर्च करावयाचा आहे. परभणी जिल्ह्याने ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही स्तरावर राज्यात सर्वप्रथम आघाडी मिळवली आहे. राज्यातील २७ हजार ८८९ ग्रामपंचायतींपैकी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील लोहगाव ग्रामपंचायत, राज्यातील ३५१ पंचायत समितींपैकी गंगाखेड पंचायत समिती आणि राज्यातील ३४ जिल्हा परिषदांपैकी परभणी जिल्हा परिषद यांनी राज्यात सर्वप्रथम पहिल्यांदा ई-ग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीद्वारे पेमेंट केले. सदरचे पेमेंट कसे करायचे याबाबतचे सादरीकरण परभणी जिल्हा परिषदेने (Parbhani Zilla Parishad) तयार केले असून ते राज्यभरात उपयोगी ठरणार आहे.

ई-ग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीद्वारे तिन्ही स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक मिळणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या परभणी जिल्हा परिषद अंतर्गत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे. जिल्हा परिषद परभणीचे तंत्रस्नेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री ओमप्रकाश यादव व आपले सरकार सेवा केंद्र टीम यांचे सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे शक्य झाले.

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.

परभणी जिल्हा परिषदेने पीएफएमएस प्रणालीद्वारे देयक अदा करण्याचा राज्यात प्रथम बहुमान मिळवला याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी ग्रामविकास विभागातील अधिकारी यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. सर्व संबंधितांचे प्रशिक्षण व तांत्रिक साहाय्य यामुळेच हे शक्य झाले.

- ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.), जिल्हा परिषद, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT