file photo 
मराठवाडा

परभणी : कोव्हिशिल्ड लसीचे जिल्ह्यात 400 जणांना डोस; भूलतज्ञ डॉ. दुर्गादास पांडे पहिले मानकरी

गणेश पांडे

परभणी ः गेल्या नऊ महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे त्रस्त असलेल्या परभणीकरांना शनिवारीचा दिवस दिलासा देणारा ठरला. कारण कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस म्हणून मान्यता मिळालेल्या कोव्हिशिल्डच्या लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. दिवसभरात चार सेंटरवरून नोंदणीकृत 400 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी (ता.16) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार डॉ. फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, यांच्यासह महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, डॉ. जयश्री यादव, अस्थिरोग तज्ञ डॉ. धुतमल, उपमहापौर भगवानराव वाघमारे, नगरसेवक चंदु शिंदे, निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आदींची उपस्थिती होती.  

यावेळी जिल्ह्यातील पहिली लस घेण्याचा मान जिल्हा शासकीय रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. दुर्गादास पांडे यांना मिळाला. त्यांना पहिली लस देण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना दुसरी लस देण्यात आली. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयासह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर 100 अधिकारी, कर्मचारी व परिचारिकांना लस देण्यात आली.

जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला मान आपल्या मिळाल्याचा अभिमान आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी कोरोनाविरोधात अहोरात्र लढत आहेत. आजचा दिवस त्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व शास्त्रज्ञांचे आपण मनुपूर्वुक धन्यवाद व्यक्त करतो. कोरोना विरूध्दच्या लढाईतीली हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

- डॉ. दुर्गादास पांडे, भूलतज्ञ

आठ महिण्यापासून आम्ही सर्व आरोग्य क्षेत्रातील अधिकारी - कर्मचारी कोरोना काळात काम करत होते. आज लस उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. लवकरच ही लसीकरण जिल्ह्यातील इतर लोकांना ही उपलब्ध होईल व आपण सर्व कोरोनाच्या संकटापासून दूर जावू यात शंका नाही.

- डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यात 10 हजार 800 लोकांची या लसीकरणासाठी नाव नोंदणी झाली आहे. त्यापैकी आज 400 जणांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी चार सेंटरवरून या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्याने 10 हजार 800 जणांना ही लस दिली जाईल.

- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT